घरCORONA UPDATEडायलिसिस रुग्णांसाठी धोरण राबवण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा; भाजप आमदाराची मागणी

डायलिसिस रुग्णांसाठी धोरण राबवण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा; भाजप आमदाराची मागणी

Subscribe

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून काही रुग्णांचे हाल वाढले आहेत. यामध्ये डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

डायलिसिस रुग्णांच्या समस्यांबाबत एकत्रित धोरण राबवता यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत सर्व अधिकार घेण्यास सक्षम असे एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून काही रुग्णांचे हाल वाढले आहेत. यामध्ये डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या रुग्णांचे एकही डायलिसिस चुकवू नये, असा सल्ला देत त्यांच्यासाठी विशेष योजना करावी, अशी मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने सुद्धा दिल्या आहेत.

सध्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेतील अधिकारी याबाबत कार्यवाही करत असले तरी डायलिसिस रुग्णांचे प्रश्न हे त्यांच्याकडील इतर कामांपैकी एक असल्यामुळे वेळेत निर्णय होत नाहीत. तसेच विविध ठिकाणच्या प्रश्नांबाबत तेथील स्थानिक अधिकारी आपल्या स्तरावर कार्यवाही करत असले तरी मोठे निर्णय घेण्यास ते सक्षम नसल्यामुळे ही कार्यवाही पुरेशी नसते. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी व डायलिसिस रुग्णांच्या समस्यांबाबत एकत्रित धोरण घेता यावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत सर्व अधिकार घेण्यास सक्षम असे एक स्वतंत्र कक्ष सुरू करावे, अशी मागणी अळवणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -