घरमुंबईपोमन येथे नवीन सब स्टेशन सुरू

पोमन येथे नवीन सब स्टेशन सुरू

Subscribe

कामन भागातील 13 हजार 900 ग्राहकांना होणार लाभ

महावितरणच्या वसई मंडल कार्यालय अंतर्गत येणार्‍या कामन परिसरातील पोमन, ता. वसई) येथे 22/22 केव्ही स्विचिंग सब स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे वसई मंडल कार्यालय अंतर्गत येणार्‍या सुमारे 13 हजार 900 ग्राहकांना फायदा होणार आहे. सुमारे 7.9 कोटी खर्च करून ’दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने’अंतर्गत पोमन सबस्टेशनचे हे काम करण्यात आले आहे. या सब स्टेशनमुळे कामन परिसरातील वीज ग्राहकांना योग्य दाबाने विना व्यत्यय वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.

या परिसराच्या वाढत्या विकासामुळे या भागाची विजेची वाढती गरज सरासरी 21 टक्के इतकी आहे. नवीन सब स्टेशनमुळे सुमारे 4.5 कोटीचा महसूल देणार्‍या घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांची ही गरज विनाव्यत्यय पूर्ण करणे महावितरणला शक्य होणार आहे.

- Advertisement -

या भागाला मिळणार वीज

महावितरणच्या 22/22 केव्ही पोमन स्विचिंग सब स्टेशनमुळे पोमन औद्योगिक वसाहत, कामन, कोल्ही, खिंडीपाडा, बापाने, चिंचोटी गाव, देवदल सागपाडा, आयेशा कंपाऊंड, पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट, शिलोत्तर, नागळे, महाजनपाडा, डोंगरीपाडा, मोरी, पोमन, भेंडीपाडा, कामन रेल्वे स्टेशन, बेबीपाडा गाव इत्यादी परिसरास अधिक चांगला वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे.

यापूर्वी कामन परिसरास वसई येथील महापारेषणच्या 100/22 केव्ही सब स्टेशन मधून वीज पुरवठा केला जात होता. वाढत्या विजेच्या मागणीमुळे या यंत्रणेवरील ताण वाढत होता. तसेच पूर्वीच्या वीज वाहिनीची एकूण लांबी सुमारे 75 किमी होती. यामुळे शेवटच्या ग्राहकांना अपवादात्मक परीस्थितीत अडचणींचा सामना करावा लागायचा. आता पोमन येथील 22/22 केव्ही स्विचिंग सब स्टेशनमुळे या अडचणी सुटल्या असून या नवीन वीज वाहिनीची लांबी 19किमी इतकी कमी झाली आहे.

- Advertisement -

पोमन केव्ही सब स्टेशनमुळे कामन परिसरातील ग्राहकांना आता अधिक चांगली वीज सेवा पुरवणे शक्य होणार आहे. या सब स्टेशनमुळे पूर्वीच्या यंत्रणेवरील भार कमी झाला आहे. पोमन सब स्टेशनची निर्मिती करताना भविष्यातील वाढत्या वीज मागणीचाही विचारही केला आहे.
– रफिक शेख, मुख्य अभियंता, कल्याण परिमंडल, कल्याण

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -