वाडिया वाचणार, पण अटींवर; अनियमिततेची चौकशी होणार!

वाडिया रुग्णालय वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेने तातडीने ४६ कोटी रुपये देण्याचं मान्य केलं असून उर्वरीत प्रलंबित १०५ कोटी रुपयांची रक्कम येत्या काही काळात ट्रस्टकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी वाडिया रुग्णालय प्रशासनाला अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

sangli mahapur : two month old baby struggles of a in vadiva hospital
वाडिया रुग्णालय

मुंबईत लहान मुलांवर उपचार करणारं वाडिया रुग्णालय बंद होणार नसून यापुढेही सुरूच राहणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यासंदर्भात आता राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिका या दोघांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत मुंबई महापालिकेने याआधीच वाडिया ट्रस्टला रुग्णालयासाठी राहिलेला २२ कोटींचा हफ्ता द्यायचं कबूल केलं आहे. आता राज्य सरकारने देखील २०१६-१७ सालच्या राहिलेल्या निधीपैकी अर्धे म्हणजेच २४ कोटी असे एकूण ४६ कोटी रुपये वाडियाला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं अजित पवार यांची भेट घेतली होती. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये वाडिया वाचवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यासाठी योग्य असा आराखडा आणि वाडिया ट्रस्टसाठी काही नियम निश्चित करण्यात येणार आहेत.

शर्मिला ठाकरेंनी वाडियासाठी घेतली अजित दादांची भेट

शर्मिला ठाकरेंनी वाडियासाठी घेतली अजित दादांची भेट

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 14, 2020

वाडियाला नियमांचं पालन करावं लागेल – महापौर

दरम्यान, यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. ‘वाडिया बंद होणार नाही. यासाठी राज्य सरकार, महापालिका आणि वाडिया ट्रस्ट या तिघांमध्ये योग्य पद्धतीचा संवाद असणं आवश्यक आहे. यासाठी वाडियामध्ये झालेल्या अनियमितपणाविषयी एक समिती नेमली जाणार आहे. कर्मचारी नियुक्ती आणि जादा बेड यासंदर्भात वाडिया ट्रस्टने महापालिकेला माहिती द्यायला हवी होती. मात्र, ती दिली गेली नाही. त्यामुळे आता आधीच्या काँट्रॅक्टमध्ये काही बदल होतील. वाडिया ट्रस्टला नियमांचं पालन करावं लागेल. शिवाय, मुंबई महानगर पालिकेकडून दरवर्षी वाडिया हॉस्पिटलला निधी वाढवून दिला जातो. मात्र, आता यासंदर्भात ही पद्धत कुठे थांबवायची, याचा निर्णय व्हायला हवा. त्यामुळे येत्या ८ दिवसांत तसा निर्णय घेतला जाईल’, असं महापौर म्हणाल्या.

वाडिया रुग्णालयाला पालिकेने या अटींवर दिली मदत

वाडिया रुग्णालयाला पालिकेने या अटींवर दिली मदत

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 14, 2020