घरमुंबईCorona Update : राज्यात २८५४ नव्या रूग्णांची भर, ६० जणांचा मृत्यू

Corona Update : राज्यात २८५४ नव्या रूग्णांची भर, ६० जणांचा मृत्यू

Subscribe

आज राज्यात २८५४ नव्या रूग्णांची भर पडली. तर कोरोनामुळे दिवसभरात ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज शनिवारी एकूण ५८,०९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. शनिवारी १,५२६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,०७,८२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३४ % एवढे झाले आहे. आज राज्यात २,८५४ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१,९१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१६,२३६ (१५.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६४,१२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. या प्रवाशांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत विशेष सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या आढळून आली आहे.

या प्रवाशांची संख्या नागपूर ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १ अशी संख्या आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -