घरताज्या घडामोडीशिवतीर्थावरील शपथविधीचा नेमका खर्च किती झाला?

शिवतीर्थावरील शपथविधीचा नेमका खर्च किती झाला?

Subscribe

ठाकरे सरकारच्या शपथविधीसाठी लागलेल्या खर्चाबाबत अचूक माहिती आणि आकडेवारी देण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा २९ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी किती खर्च करण्यात आला आहे? याची अजूक माहिती देण्यात राज्यशासन अपयशी ठरले आहे. माहिती अधिकार अर्जाच्या सादर करण्यात आलेल्या खर्चाबाबत मोठी तफावत आढळून आली आहे. ठाकरे सरकारच्या या शपथविधी सोहळ्याकरिता लागलेला खर्च जाणून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाकडे असंख्य अर्ज दाखल झाले. मात्र या खर्चाबाबतची अचूक माहिती आणि आकडेवारी देण्यात आलेली नाही.

जाणूनबुजून खर्चाची आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न 

माहिती कक्ष अधिकारी रा.रो.गायकवाड यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना या सोहळ्याच्या खर्चाबाबत एकूण खर्च २ कोटी ७९ लाख झाल्याचं कळविले. तर अर्जदार अजय बोस यांना एकूण खर्च ४ कोटी ६३ लाख झाल्याचं सांगितलं. या दोन्ही आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळली. त्यामुळे गलगली यांनी जन माहिती अधिकारी यांना संपूर्ण माहिती नसतानाही अर्धवट माहिती देण्यात काय स्वारस्य आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच याबाबत कोणी जाणूनबुजून माहिती आणि खर्चाची आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न करत नाही ना याची चौकशी करण्याची मागणी देखील गलगली यांनी केली आहे.

- Advertisement -

शपथविधी सोहळ्याचा खर्च संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा

शासनाने माहिती अधिकारी कायदा अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत शपथविधी सोहळ्याचा खर्च संकतेस्थळावर प्रसिद्ध करावा. कारण हा खर्च जनतेच्या तिजोरीतुन होत असल्यामुळे याबाबत अचूक आणि खरी माहिती द्यावी, अशी देखील मागणी गलगली यांनी केली आहे.


हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ कार्यक्रमाला मनसेचा विरोध

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -