घरताज्या घडामोडीकेंद्राकडे तपास गेला तरी भीमा-कोरेगाव प्रकरणी SIT नेमणार - आव्हाड

केंद्राकडे तपास गेला तरी भीमा-कोरेगाव प्रकरणी SIT नेमणार – आव्हाड

Subscribe

केंद्र सरकार पितृतुल्याच्या भूमिकेत असते तर राज्य सरकारला स्वतःचे अधिकार आहेत. यामध्ये ढवळाढवळ व्हायला नको, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

भीमा कोरगाव प्रकरणात एनआयएमध्ये कागदपत्रे दिली नाहीत तर सरकार बरखास्त करू, अशी धमकी काही भाजपचे लोक देत आहेत. पण या धमक्यांना कोण घाबरतो? मराठी माणसांच्या मताचे सरकार तुम्ही केंद्राचे अधिकार वापरून खेचून घेणार का? ऑगस्ट महिन्यामध्ये मागील सरकाने केंद्रात प्रतिज्ञापत्र दिले की महाराष्ट्रात या प्रकरणात अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत आहे, त्यामुळे कोणत्याही केंद्रीय पथकाला हे काम देण्यात येऊ नये. त्यानंतर या विषयातील चार्जशीट दाखल झाली. एनआयएकडे केस गेल्यावर तपास बंद होतो असे नाही? एनआयए कायद्यानुसार महाराष्ट्र वेगळा तपास करू शकतो, असा कायदा आहे. त्यामुळे एसआयटी स्थापन व्हायला काही अडचण नाही. पण याच्यातून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. केंद्र हा पितृतुल्याच्या भूमिकेत आहे, राज्य वेगळ्या भूमिकेत आहे. संविधानाने या दोन व्यवस्थेंमध्ये कोणाकडे काय असेवा याबाबतचे स्पष्ट मत दिले आहे.

ठाण्याची सांस्कृतिक बौद्धिक भूक

ठाण्यात खूपच औपचारिकता आलेली आहे. आमच शहर डॉर्मिटरी झालेल आहे. सकाळी लोक कामासाठी बाहेर पडतात आणि रात्री घरी परतात. त्यांचा शहराशी काही संबंधच राहिलेला नाही. ठाण्याला सांस्कृतिक भुक आहे, बोद्धिक भुक आहे, ज्ञानाची भूक आहे. ज्ञान हे चहुबाजुने येत असते त्याला एक दालन मिळायला हवे. अशा दालनाची व्यवस्था करणे गरजेची आहे.

- Advertisement -

मुकनायक सारख्या वृत्तपत्रांची पुन्हा एकदा गरज

आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकची स्थापना केली. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यावेळच्या प्रस्थापित वृत्तपत्रांमध्ये मागासवर्गीय समाजाला बातम्यांमध्ये स्थानच मिळत नाही. त्यांच्या व्यथा, त्यांचे विचार, त्यांच्यावर झालेले अन्याय मांडलेच जात नाहीत तेव्हा त्यांनी मुकनायकची सुरूवात केली. मुकनायक वृत्तपत्र काढताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पहिल्यांदा बीआयटी चाळीमध्ये शाहु महाराज आले. त्यांनी वृत्तपत्रासाठी अडीच हजार रूपये दिले आणि पुन्हा एकदा वृत्तपत्राला सुरूवात झाली. या घटनेला एकुण १०० वर्षे झाली आणि आजच ठाण्यात महानगरची सुरूवात झाली. आजही माझ स्पष्ट मत आहे की एका मुकनायकाची आणि एका भीमाची पुन्हा एकदा गरज आहे. अजुनही मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांमध्ये सोशीत समाजाला म्हणाव तस स्थान दिल जात नाही. एका विशिष्ट व्यवस्थेच्या हातात असलेली वृत्तपत्र आजही दलित, सोशित, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती यांना फार काही न्याय मिळतो अस काही लिहित नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -