घरमुंबईप्राध्यापकांच्या रखडलेल्या नियुक्त्या होणार; राज्यमंत्र्यांचा पुढाकार

प्राध्यापकांच्या रखडलेल्या नियुक्त्या होणार; राज्यमंत्र्यांचा पुढाकार

Subscribe

उच्च शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्यता असल्याने प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या अशी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.

राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावू नये यासाठी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडून योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या अशी विनंती रविंद्र वायकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांतील आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्यता असल्याने या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य शासनाला आपल्या स्तरावर निर्देश देण्यात यावे, अशी विनंती वायकर यांनी राज्यपालांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

प्राध्यापक संघटना नाराज

राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावताना दिसत नाही. प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासन पातळीवर योग्य ती पावले उचलताना दिसत नाही त्यामुळे प्राध्यापक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्राध्यापकांच्या संघटनांनी रविंद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन केले होते.

- Advertisement -

गुणांकनात वाढ करणे कठीण होत आहे

राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी याप्रकरणी थेट राज्यपालांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने उच्च शिक्षणाचा स्तर उंचावण्या बरोबरच आहे तसाच कायम ठेवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ‘एनआयआरएफ’ मध्ये आपल्या संस्थेच्या गुणांकनात वाढ करणे विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कठीण होत असल्याचे राज्यमंत्री वायकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.

शासन वेगाने पाऊल उचलत नाही

तसंच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणुन आपल्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली होती. याप्रश्‍नी तात्काळ निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी बैठकीत मान्य केले होते. परंतु त्यानंतर प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासन वेगाने पावलं उचलत नसल्याचे दिसून येत, असल्याचे वायकर यांनी कुलपतींना पत्राद्वारे कळविले आहे.

- Advertisement -

शासनाला योग्य ते निर्देश द्या

दरवेळी अधिवेशनात विविध आमदारांकडून प्राध्यापकंच्या रिक्त जागांप्रश्‍नी वारंवार प्रश्‍न उपस्थित करण्यात येतात. परंतु प्रत्येतवेळी याचे नेमकं उत्तर देणं शक्य होत नाही. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणुन आपण याप्रश्‍नी स्वत: लक्ष घालून प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनान योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती वायकर यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -