CoronaVirus – कल्याण- डोंबिवलीत मंगळवारपासून भाजीपाला किरणा दुकानेही बंद!

शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तंचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुकत डाॅ विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

Maharashtra Lockdown Timings to keep shops open likely to be extende
Maharashtra Lockdown : इतर दुकानेही खुली ठेवण्यासाठी वेळ वाढवून मिळण्याची शक्यता

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ६ नविन रूग्‍ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत करोना बाधित रूग्‍णसंख्‍या ३४ झाली आहे. डोंबिवलीयेथील लग्‍न सोहळयाशी संबंधित त्या तरूणाला कस्‍तुरबा रुग्‍णालयातून पुर्नतपासणअंती डिसचार्ज मिळाला आहे. करोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी शहरात लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. मंगळवार ७ एप्रिलपासून शहरातील मेडीकल,  रूग्णालय व दवाखाने वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत.

सोमवारी नव्याने आढळलेल्या ६ रूग्णांपैकी  डोंबिवली पश्चिमेतील ३ जण असून,  डोंबिवली पूर्वेतील एकाचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेतील दोन जणांचा समावेश आहे. डोंबिवली पश्चिमेतील एका ३० वर्षीय व्यक्तीचा करोनाबधित रूग्णांशी निकटचा संबध आला आहे तर डोंबिवली पश्चिमेतील २२ वर्षीय महिला ही जसलोक रूग्णालयात परिचारिका आहे. तीला करोनाची बाधा झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील ३० वर्षीय महिलाही करोनाबाधित रूग्णाची निकटवर्तीय आहे तर कल्याणातील रूग्णही करोनाबाधितांच्या सहवासात आल्याने त्यांना करोनाची बाधा झाली आहे. करोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे २१० आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणार

शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तंचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुकत डाॅ विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. मंगळवार संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत. मेडीकल रूग्णालये व दवाखाने सेवा वगळता भाजी विक्री  किराणा दुकाने आणि डेअरी ही दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. गर्दी टाळण्यासाठीच हे प्रतिबंधक करण्यात येत असून, या आदेशाचे उल्ल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

कुठे किती रूग्ण

कल्‍याण (पूर्व)- ०५

कल्‍याण (प)- ०७

डोंबिवली (पूर्व)- १६

डोंबिवली (प.)- ०६