घरमुंबईStock Market : निर्देशांकाची विक्रमी उसळी; जागतिक गुंतवणूकदारांची भारताला पसंती

Stock Market : निर्देशांकाची विक्रमी उसळी; जागतिक गुंतवणूकदारांची भारताला पसंती

Subscribe

मुंबई : अमेरिकन बाजारातील मजबूतीमुळे देशांतर्गत बाजारांनी आपला तेजीचा कल कायम ठेवला आहे. आज (7 फेब्रुवारी) भारतीय शेअर बाजारात विक्रमी उच्चांकासह व्यवहार सुरू झाला. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 72500 चा स्तर पार केला. त्याचवेळी निफ्टीनेही वाढ नोंदवत 22,000 चा टप्पा पार केला. (Stock Market Bounce of the index in the stock market Global investors prefer India)

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

- Advertisement -

सकाळी 9.15 वाजता सेन्सेक्स 362.41 अंकांच्या (0.50 टक्के) वाढीसह 72,548.50 वर आणि निफ्टी 115.65 अंकांच्या (0.53 टक्के) वाढीसह 22,045.05 वर व्यवहार करत आहे. त्यानंतरही बाजार तेजीत दिसून येत आहे. बीएसईचा सेन्सेक्स 30 शेअर्सवर आधारित 373.12 अंकांनी वाढून 72,559.21 वर पोहोचला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील 123.9 अंकांनी वाढून 22,053.30 वर पोहोचला आहे.

पेटीएम शेअर्समध्ये वाढ 

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे प्रमुख वधारले, तर दुसरीकडे एचसीएल, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, विप्रो, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकेचे टेक्नॉलॉजी शेअर्स तोट्यात राहिले. मात्र त्याचवेळी, पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये आज 10 टक्के वाढ झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात पेटीएम स्टॉकची किंमत 496.25 च्या पातळीवर पोहोचली.

- Advertisement -

मंगळवारी विदेशातून 92.52 कोटी  रुपयांचे शेअर्स खरेदी

मंगळावीर 30 समभागांवर आधारित सेन्सेक्स 454.67 अंकांनी किंवा 0.63 टक्क्यांनी वाढून 72,186.09 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157.70 अंकांच्या किंवा 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 21,929.40 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) भांडवली बाजारात निव्वळ खरेदीदार होते. मंगळवारी त्यांनी 92.52 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हेही वाचा – Maharashtra Politics : 84 वर्षांच्या म्हाताऱ्याला संपवण्यासाठी…, आव्हाडांकडून संताप व्यक्त

जागतिक गुंतवणूकदारांची भारताला पहिली पसंती

एचएसबीसी या जागतिक बँकिंग फर्मने सादर केलेल्या अहवालानुसार ग्लोबल मार्केट कॅपमध्ये भारतीय शेअर बाजाराचा वाटा वाढला आहे. भारतीय शेअर बाजार रेकॉर्ड स्तरावर पोहचले आहे. भारताचा वाटा जानेवारी 2024 मध्ये 4 टक्क्यांच्या स्तरावर पोहचला आहे. त्यामुळे भारत आता उभरत्या बाजारपेठेत जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंत आहे. याबाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2023 च्या अखेरीस बीएसई मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून पुढे गेल्याची बातमी होती. मात्र आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एनएसईचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. भारतीय बाजाराने 4 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये स्थान बळकट करत हाँगकॉग शेअर बाजाराला मागे टाकत जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -