घरमुंबईफाईव्ह स्टार हॉटेलमधील नोकरीच्या आमिषाने लुटले

फाईव्ह स्टार हॉटेलमधील नोकरीच्या आमिषाने लुटले

Subscribe

जे डब्लू मॅरियट हॉटेलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तीन भामट्यांनी मिळून एकाला २ लाख ८५ हजार रुपयांना लुटले असल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी आरोपींना नोएडा इथून अटक केली असून पायधुनी पोलिसांच्या पथकाने ही उत्तम कामगिरी केलेली आहे.

शामरोझ नदिम पठाण हे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेवून सौदी अरेबिया या ठिकाणी नोकरीला लागले होते. मात्र काम संपल्यानंतर ते मुंबईत परतले आणि नोकरीसाठी अनेक ऑनलाईन वेबसाईटवर त्यांनी आपली माहिती भरली होती. त्यांनी भरलेल्या माहितीनंतर त्यांना फोन आला आणि जे डब्लू मॅरियट हॉटेलमध्ये मॅनेजर पदाची जागा भरणे असून त्या नोकरीसाठी तुमची मुलाखत घेण्यात येईल असा आशयाचा एका फोन त्यांना आला. त्यानुसार पठाण यांनी मुलाखतीला संमती दिली. पण समोरुन आलेल्या फोनवरुन आलम नावाच्या व्यक्तीने त्यांची मुलाखत घेतली.

- Advertisement -

या मुलाखतीनंतर त्यांना आणखी एक फोन आला. त्यांना जे डब्लू मॅरियट हॉटेलच्या मॅनेजर पदाचे ऑफर लेटर मेल केले असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना ऑफर लेटर मिळाले होते. पण काही दिवसांनंतर त्यांनी जे डब्लू हॉटेलमध्ये फोन करुन विचारणा केली असता अशी कोणतीही जागा रिकामी झाली नसून तिथून ऑफर लेटर पाठवले नसल्याचे सांगितले. या प्रकारानंतर शामरोझ पठाण यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी तत्काळ पायधुनी पोलीस ठाण्यात धाव घेवून यासंदर्भात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता फसवणूक करणारे आरोपी हे उत्तरप्रदेश आणि दिल्लीवरून कॉलसेंटरच्या माध्यमातून अशाप्रकारचे गुन्हे करत असल्याचे समजले.

त्यानुसार पायधुनी पोलिसांच्या पथकाने दिल्लीला जावून यामागच्या सूत्रधारांना शोधायला सुरुवात केली. दरम्यान, उत्तरप्रदेशमधून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता हे बोगस कॉलसेंटरचे रॅकेट असून नोकरी डॉट कॉम सारख्या वेबसाईटचा आधार घेवून बनावट मेल आयडीचा आधार घेत अनेकांची फसवणूक करतात असे उघड झाले. त्यानुसार दोन आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पायधुनी पोलिसांच्या पथकाने नोएडामधून कॉलसेंटर चालवणार्‍या आरोपीस अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन लॅपटॉप, १५ मोबाईल, ६ एटीएम कार्ड, पेनड्राईव्ह, हेडफोन आणि रोख रक्कम एक लाख रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -