लोकल ट्रेनवर अज्ञातांची दगडफेक, महिला प्रवासी जखमी

सध्या जखमी महिला प्रवासी रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहेत.

Harbor Rail
हार्बर रेल्वे

ठाण्यावरुन सुटलेली लोकल ट्रेन दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान असताना, काही अज्ञात लोकांनी लोकलवर जबरदस्त दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एक महिला प्रवासी जखमी झाली. या जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे लोकल प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली. दरम्यान लोकल ट्रेनवर दगडफेक करणारे लोक कोण होते तसंच त्यांचा या दगडफेकीमागचा नेमका उद्देश काय होता? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या महिलेचं नाव कांचन हाटले असं असून, त्या दिवा परिसरात राहतात.


वाचा: प्रवासापेक्षा मुतारी महाग

एक महिन्यापूर्वीच त्यांनी अंधेरीतील नोकरी सोडून मुलुंडच्या एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली होती. रोजच्याप्रमाणे काम संपवून कांचन लोकल ट्रेनने घरी येत होत्या. मात्र, ट्रेन मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान असताना काही अज्ञाातांनी दगडफेक सुरु केली. यामध्ये कांचन यांना दगड लागल्यामुळे त्या जखमी झाल्या तसंच त्यांचे दातही तुटले. लोकल डोंबिवली स्थानकात पोहचताच कांचन यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच डॉक्टरांनी कांचन यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सध्या कांचन रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.


कारण काय? –  मोनो रेलची क्रेझ घसरली