घरCORONA UPDATEदिवेलागणीच्या ९ मिनिटांत पोलीस पाटलाच्या घरावर दगडफेक!

दिवेलागणीच्या ९ मिनिटांत पोलीस पाटलाच्या घरावर दगडफेक!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करून दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, त्याच वेळी अनेक ठिकाणी या आवाहनाला हरताळ फासण्याचं देखील काम झालं. अनेकांनी रस्त्यावर लग्नासारख्या वाजत-गाजत मिरवणुका काढल्या, तर काहींनी गर्दी करत कोरोनाचे पुतळे जाळले. अशीच काहीशी घटना भिवंडीच्या पिंपळास गावात घडली असून गावाच्या पोलीस पाटलाच्या घरावर या ९ मिनिटांच्या अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

गावात फिरताना हटकल्यामुळेच दगडफेक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळास गावातील नागरिकांनी वीज पुरवठा खंडित केला होता. याचा फायदा घेत पोलीस पाटील अशोक जाधव यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात गावात दारू विक्री होऊ नये तसेच गावातील काही मोकाट मुलं चौकाचौकामधे फिरून गर्दी करुन टवाळक्या करत असल्यामुळे पोलीस पाटील अशोक जाधव त्यांना गावात फिरण्यास वारंवार मनाई करत होते. त्यासोबतच ते पोलिसांसोबत कोरोनासंदर्भात जनजागृती देखील करीत असल्यामुळेच आपल्या घरावर दगडफेक केल्याचा संशय पोलीस पाटील अशोक जाधव यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तीन समाजकंटकांवर कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असता कोनगाव पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -