Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Lockdown : मुंबईत कडक निर्बंध, पण लोकलबाबत वडेट्टीवारांची मोठी घोषणा

Lockdown : मुंबईत कडक निर्बंध, पण लोकलबाबत वडेट्टीवारांची मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Related Story

- Advertisement -

राज्यात दुसऱ्या लाटेच्या कोरोचा प्रादुर्भाव जलदगतीने होत आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे राज्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकडे होत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार अशी कुरबूर सुरु आहे. त्यामुळे मुंबईकर धास्तावले आहेत. यातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. परंतु लोकल बंद करण्यात येणार नाही असे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकल बंद करण्यात येणार का? असा प्रश्न वडेट्टीवार यांना विचारला असता त्यांनी उत्तरात सांगितले की, लोकलसंदर्भात मागील वर्षी आपण निर्णय घेतला होता. पण विभागणी केली असून वेळेनुसार प्रवाशांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये नंतर आरोग्य विभाग, रेस्तरॉ, कर्मचारी,चाकरमानी यांचा समावेश होता. त्यामुळे मागील वेळी जशी उपाययोजना केली होती. तशीच आता पुन्हा उपाययोजना करणार आहोत. लोकल बंद होणार नाही परंतु त्यावर कडक निर्बंध लावण्यात येतील आणि गर्दीला नियंत्रणात आणण्यात येईल असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना उपाययोजानंसंदर्भात सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक आहे. कोरोना पुन्हा रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील याबाबतही चर्चा होणार आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी कशी करायची याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाबाबत काय निर्णय होणार किंवा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत काही निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सामान्यांचा ट्रेन प्रवास बंद होण्याची शक्यता – महापौर

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईची वाटचाल पुन्हा डेंजर झोनकडे होत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. सामान्य प्रवाशांना ट्रेन प्रवास करणे बंद करण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.


- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, कोरोनासंदर्भात घेणार आढावा


 

- Advertisement -