घरCORONA UPDATEकामगारांच्या बडतर्फीबाबत संघटनांचे तीव्र आक्षेप, कारणे तपासून कारवाईची मागणी!

कामगारांच्या बडतर्फीबाबत संघटनांचे तीव्र आक्षेप, कारणे तपासून कारवाईची मागणी!

Subscribe

कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७२ तासांची नोटीस देऊन बडतर्फ करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत.

वारंवार कामावर हजर राहण्याच्या सुचना करूनही गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने ७२ तासांची नोटीस देत कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतरही कर्मचारी हजर न झाल्यास त्यांना थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या कामगार संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहे. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या कारणांची नीट चौकशी केल्याशिवाय त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करू नये,अशी सूचना कामगार संघटनांनी केली आहे.

वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचा-यांना शेवटची संधी म्हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्याचे  निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. ही नोटीस साथरोग कायद्यानुसार व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार देण्यात येणार आहे. तसेच ज्या कर्मचा-यांचे वय ५५ वर्षे  किंवा अधिक आहे आणि‍ ज्यांना काही आजार आहे, त्यांना ‘नॉन कोविड’ कामे दिली जातील, असेही सदर नोटीशीत नमूद करण्याचे निर्देशित करण्यत आले आहे. ७२ तासांची नोटीस देऊन देखील जे कर्मचारी हजर होणार नाहीत,  त्‍यांना तात्कळ बडतर्फ करण्याचे व त्यांच्या जागी कंत्राटी तत्वावर नवीन कर्मचा-यांची नियुक्ती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

यासंदर्भात बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी महापालिका आयुक्त चहल यांना निवेदन पाठवून त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कारणाची नीट चौकशी केल्या शिवाय बडतर्फीचे आदेश देण्यात येऊ नयेत, अशी विनंती केली आहे.  कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७२ तासांची नोटीस देऊन बडतर्फ करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. सरसकट सर्व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना असे आदेश देणे चुकीचे होईल. त्याकरता कर्मचारी का गैरहजर राहत यांची छाननी करणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचे वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय आहे व त्यांना काही आजार आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांना रेल्वे सुरू नसल्यामुळे कामावर उपस्थित राहणे शक्य होत नाही,  अशाप्रकारे कर्मचारी गैरहजर राहण्याची दोन कारणे देत अशा कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणे चुकीचे होईल, असे म्हटले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – चिअर्स! दारू स्वस्त होणार, सरकाराने घेतला नवीन निर्णय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -