घरमुंबईम्हणून मुंबईत दिवसा कडक ऊन आणि पहाटे गारठा

म्हणून मुंबईत दिवसा कडक ऊन आणि पहाटे गारठा

Subscribe

दिवसा वातावरणात भयंकर गरमी जाणवतेय, तर रात्री झोपताना घरातील पंख्यांचीसुद्धा आवश्यकता वाटत नाही. पहाटे तर अंगावर चादर, ब्लँकेट किंवा गोधडी नसेल तर झोपूच शकत नाही, इतकी थंडी जाणवत आहे. का होत आहेत वातावरणात इतके बदल?

मुंबईकर दररोज हवामानातले बदल अनुभवत आहेत. दिवसा वातावरणात भयंकर गरमी जाणवतेय, तर रात्री झोपताना घरातील पंख्यांचीसुद्धा आवश्यकता वाटत नाही. पहाटे तर अंगावर चादर, ब्लँकेट किंवा गोधडी नसेल तर झोपूच शकत नाही, इतकी थंडी जाणवत आहे. मुंबईकरांना ऑक्टोबर हिटची आता सवय झाली आहे. परंतु या ऑक्टोबर हिटच्या काळात अचानक वातावरणातला गारवा पाहून मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वातावरणातल्या या बदलाबाबत माय महानगरने मुंबई वेधशाळेशी संपर्क साधला. यामध्ये अशी माहिती मिळाली की, मुंबईसह राज्यात अद्याप हिवाळा सुरू झालेला नाही. परंतु उत्तरेकडून वाहणाऱ्या गरम हवेमुळे मुंबईत दिवसा खूप गरमी वाढतेय तर रात्री आकाश मोकळे असल्यामुळे रात्री वातावरणातील तापमान कमी होत आहे. त्यामुळे रात्री थंडी आणि दिवसा गरमी असा फरक मुंबईकरांना जाणवतोय.

वाचा – ओला-उबेर चालकांचा संप मागे?

- Advertisement -

नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. परंतु त्याअगोदरच्या ऑक्टोबर हिटने मुंबईकर बेहाल झाले आहेत. परंतु पहाटेच्या वेळी वातावरणातल्या गारव्याने मुंबईकरांना सुखद धक्का दिला आहे. रविवारी मुंबईत कमाल ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर सोमवारी मुंबईत ३७.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दुपारी मुंबईकर गरमी आणि घामाने बेहाल होत आहेत. गेल्या १० वर्षात मुंबईत पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबईत सध्या ऑक्टोबर हिटचे वातावरण आहे. शिवाय उत्तर पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे वातावरणातील तापमान अधिकच वाढत आहे. मुंबईत कमाल तापमान हे गेल्या काही दिवसांपासून ३५ पेक्षा जास्त आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अद्याप हिवाळा सुरू झालेला नाही. परंतु मुंबईसह राज्यभरात आकाश मोकळे आहे. आकाशात ढग नसल्याने रात्रीच्या वेळी जमीनीवरील गरम हवा वर जाते व त्यामुळे रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. नाशिकसह आसपासच्या परिसरात किमान तापमान हे १५ अंशापेक्षा कमी झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही किमान तापमान घसरले आहे.
– कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, इंडियन मेट्रोलॉजिकल डे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -