Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दांत निषेध; शरद पवारांनी लक्ष घालण्याचे गृहमंत्र्यांना केले आवाहन

पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दांत निषेध; शरद पवारांनी लक्ष घालण्याचे गृहमंत्र्यांना केले आवाहन

Subscribe

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एक मोर्चा काढला होता. पण त्या मोर्चातील विद्यार्थींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे बराच गोंधळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

भारतीय कुस्तीपटूंपैकी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करत अटक करण्याची मागणी केली होती. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी यासाठी पैलवान दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी पॉस्कोसह विविध कलमे लावत गुन्हा दाखल केला, मात्र बृजभूषण यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू ठेवले आहे.

- Advertisement -

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थनार्थ देण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एक मोर्चा काढला. पण त्या मोर्चातील विद्यार्थींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे बराच गोंधळ झाला. यावर शरद पवारांनी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणींवर दिल्ली पोलिसांनी केलेले अन्यायकारक वर्तन दुःखद आणि अस्वस्थ करणारे आहे. शांततापूर्ण आंदोलनांवरील पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि मी वैयक्तिकरित्या भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करतो, असे ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी अमित शाह आणि होम मिनिस्टर ऑफ इंडियाला टॅग केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, बुधवारी रात्री कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दारुच्या नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी फोल्डिंग बेड्स आणले होते, पण पोलिसांनी या बेड्सवर आक्षेप घेत कुस्तीपटूंना धक्काबुक्की केली आहे. या प्रकारानंतर कुस्तीपटूंनी खेळातील मेडल्स आणि सरकारने दिलेले पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.

मेडल्सचा हाच सन्मान असेल तर ते परत करू
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, जर आमच्या मेडल्सचा हाच सन्मान असेल तर या मेडलचं आम्ही काय करणार. त्यापेक्षा आम्ही सामान्य जीवन जगू आणि हे मेडल आम्ही भारत सरकारला परत करु. पोलीसांनी धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली, तेव्हा त्यांना हे कळलं नाही की, खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने  सन्मानित करण्यता आले आहे. पोलिसांनीच या पुरस्काराची लाज ठेवली नाही. त्यांनी दारु पिऊन गैरवर्तन केले आहे. या प्रकरणाला सरकार कसे हातळणार आहे, असा प्रश्न पुनियाने उपस्थित केला आहे.

- Advertisment -