घरताज्या घडामोडीHindustaniBhau: हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज वांद्रे कोर्टाने फेटाळला

HindustaniBhau: हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज वांद्रे कोर्टाने फेटाळला

Subscribe

धारावी परिसरात दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी समर्थन देण्यात हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने हिंदुस्तानी भाऊला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केला आहे.

Students Agitation Hindustanibhau : राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी चिथवल्याप्रकरणी हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला धारावी पोलिसांकडून अटक करण्यात आली. हिंदुस्तानी भाऊच्या जामीनासाठी वांद्रे कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र त्याचा जामीन अर्ज वांद्रे कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. (Students Agitation Bandra court rejects Hindustanibhau bail plea)  धारावी परिसरात दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी समर्थन देण्यात हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने हिंदुस्तानी भाऊला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊचा कोठडीतील मुक्काम काही दिवसांसाठी वाढला असून त्याचे वकील आता सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

३१ जानेवारी रोजी मुंबईच्या धारावी परिसरात दहावी बारावीच्या ऑफलाईन परिक्षांविरोधात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. यावेळी हिंदुस्तानी भाऊ देखील उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याआधी हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्याने विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे ? असा प्रश्न करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चिथवण्यात हिंदुस्तानी भाईचा हात होता हे सिद्ध झाल्यानंतर हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हिंदुस्तानी भाऊ विरोधात इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चिथवल्याप्रकरणी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे,दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद आणि महाराष्च्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना चिथवल्याचे कबूल करत बिनशर्त माफी देखील मागितली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हा माझा हेतू असे त्याने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –  Hindustani Bhau: परिस्थितीमुळे बारमध्ये भांडीही घासली, आज लाखो फॉलोअर्स असणारा ‘हिंदुस्तानी भाऊ’…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -