घरमुंबईक्रीडा शिक्षक होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

क्रीडा शिक्षक होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Subscribe

बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाला मिळतेय पसंती

राज्यातील बीएड, एमएड कॉलेजमधील जागा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्याने अनेक कॉलेज प्रशासनांवर कॉलेज बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र क्रीडा शिक्षक होण्याच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बीएड, एमएडच्या तुलनेत बीपीएड, एमपीएडच्या जागांमध्ये यावर्षी वाढ होऊनही फार कमी जागा रिक्त राहिल्या आहेत. क्रीडा शिक्षकांना शाळा, कॉलेजसह अन्य क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असल्याने तरुणांचा क्रीडा शिक्षक होण्याकडे कल वाढत आहे.

राज्य सामायिक प्रवेश कक्षामार्फत (सीईटी) बीपीएड, एमपीएडच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी नुकत्याच पार पडलेल्या प्रवेश परीक्षेत बीपीएड, एमपीएडच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षी बीपीएडच्या राज्यामध्ये ४५८० जागा होत्या त्यापैकी २४४४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर २१३६ जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र २०१९-२० या शैक्षणिक वर्षात बीपीएड अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 270 जागांची वाढ ंहोऊन त्या 4850 इतक्या झाल्या होत्या. असे असतानाही यावर्षी तब्बल 3327 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर अवघ्या १५२३ जागा रिक्त राहिल्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

बीपीएडप्रमाणेच एमपीएड अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळाली आहे. २०१८-१९ मध्ये एमपीएडच्या राज्यभरात ८६० जागा होत्या. त्यापैकी ६८२ जागांवर प्रवेश झाले तर १७८ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०१९-२० मध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४५ जागांची वाढ होऊन ९०५ जागा झाल्या होत्या. यातील ८०८ जागांवर प्रवेश झाले तर ९७ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे बीपीएडच्या तुलनेत एमपीएड करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे बीएड, एमएएड करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असताना क्रीडा शिक्षक होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -