घरताज्या घडामोडीचिमुरड्यांनी घरातच काढली 'करोना'वर चित्रे

चिमुरड्यांनी घरातच काढली ‘करोना’वर चित्रे

Subscribe

शालेय विद्यार्थ्यांनी चित्रातून रेखाटला करोना.

‘करोना’ विषाणूमुळे सर्वजण घाबरलेले असतानाच आता शालेय विद्यार्थ्यांच्या मनातला करोना नेमका कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने ‘आर्ट थेरपी’चा अवलंब केला. सध्या घरीच असलेल्या विद्यार्थ्यांना करोना विषयावर चित्र काढण्याचा गृहपाठ शाळेच्या शिक्षकांनी दिला होता. हा गृहपाठ विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून केला असून ही काढून समाज माध्यमांद्वारे शिक्षकांना पाठवली.

- Advertisement -

मनातली भीती घालवण्यासाठी ‘आर्ट थेरपी’चा अवलंब

डी. एस. हायस्कूलमध्ये चार वर्षांपासून ‘चित्रपतंग’ कला समूहाच्या माध्यमातून कला साक्षरता वर्ग भरवला जातो. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कला साक्षरता आणि दृष्यभान विकसित करण्यावर भर दिला जातो. तसेच करोनाच्या बातम्या लहान मुलांच्या कानांवर सतत पडत आहेत. त्याचप्रमाणे करोनाविषयीची भीती पालकांच्या मनातून मुलांच्या मनात संक्रमित होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मनातला करोना कसा आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. शिवाय, विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या सरावात कोणताही खंड पडू नये, अशीही इच्छा होती. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना हा विषय दिला. विद्यार्थ्यांनीही आम्हाला त्यांची चित्रं व्हॉट्सअपद्वारे पाठवून चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती चित्रपतंग’च्या संचालिका प्राची श्रीनिवासन यांनी दिली.

चित्रं काढणं ही एक आर्टथेरपी!

“करोनासारख्या आपत्तीच्या आणि त्यानंतरच्या काळातही पालकांच्या किंवा स्वत:च्या मृत्यूचे भय किंवा त्या प्रकारच्या भितीचे पडसाद लहान मुलांच्या मनात अनेक वर्षं उमटत राहतात. ते चित्राद्वारे किंवा कुठल्याही कला-लिखाणाद्वारे मनातून उतरले नाहीत तर अशा पडसादांचा त्यांच्या मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम घडू शकतो. चित्रं काढून स्वत:ला अभिव्यक्त करणं ही एकप्रकारे ‘आर्ट थेरपी’च आहे’, असे मत डी. एस. हायस्कूलमध्ये कला साक्षरतेचे वर्ग घेणाऱ्या प्राची श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.


हेही वाचा – करोनानंतर राज्यावर आणखी एक मोठं संकट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -