घरमुंबईमोबाईल वरून कलचाचणीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

मोबाईल वरून कलचाचणीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Subscribe

11 लाखजणांनी दिली परीक्षा

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराची उपलब्धता यातील दरी कमी व्हावी, यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल महत्त्वाचा असल्याने शिक्षण विभाग व श्यामची आई फाऊंडेशनमार्फत यावर्षी प्रथमच कल व अभिक्षमता चाचणी परीक्षा मोबाईलवर उपलब्ध करून दिली. ही परीक्षा मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध केल्याने शहरासह ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन आठवड्यांमध्ये राज्यातून तब्बल 11 लाख 57 हजार 332 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली आहे. त्यासाठी ३ लाख ७० हजार पेक्षा जास्त मोबाईल फोन वापरण्यात आले आहेत. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही परीक्षा सोपी असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

शिक्षण विभागातर्फे तीन वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांची कल व अभिक्षमता चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट व कम्प्युटरची समस्या असल्याने यावर्षी प्रथमच ही चाचणी श्यामची आई फाऊंडेशन, पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या सहकार्याने ‘महाकरिअरमित्र’ पोर्टल व मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. १८ डिसेंबर २0१८ पासून राज्यातील विविध शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा सुरू करण्यात आली. मोबाईलवर ही चाचणी घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चाचणी मिळत आहे. आतापर्यंत राज्यभरातील 20 हजार 251 शाळांनी या चाचणीसाठी आपले नाव नोंदवले आहे. दोन आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी 1 लाख 92 हजार 662 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याखालोखाल मुंबई 1 लाख 80 हजार 701, नाशिक 1 लाख 59 हजार 457 तर सर्वात कमी कोकण भागातून 25 लाख 634 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा प्रत्येक शाळेत सुरळीत पार पडत असून आतापर्यंत कोणतेही गोंधळ झाला नाही. ही परीक्षा सोपी आणि प्रश्नाचे उत्तर देण्यात कोणत्याही अडचणी आल्या नसल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

वेळेची मर्यादा
कल चाचणीनुसार कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रामधील अभिरुचीचे मापन केले जाते. अभिक्षमता चाचणी भाषिक, सांख्यिकीय, अवकाशीय आणि तार्किक या चार क्षमतांचे मापन करते. या चाचणीसाठी वेळेची मर्यादा आहे. भाषिक क्षमता परीक्षणासाठी १५ मिनिटे व तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय क्षमता परीक्षणासाठी प्रत्येकी २० मिनिटे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आवड आणि क्षमता यांची योग्यरित्या सांगड घालण्यास नक्कीच मदत होईल.

अ‍ॅप अनइन्स्टॉल करू नये
हे शैक्षणिक अ‍ॅप प्ले स्टोअर वरून घ्यावे ते अनइन्स्टॉल करू नये,दहावीच्या परीक्षेनंतर याच अ‍ॅपवर विद्यार्थी स्वतःचा एसएससी परीक्षेचा बैठक क्रमांक टाकून स्वतःचा कल व अभिक्षमता चाचणीचा संयुक्त अहवाल पाहू शकतील. आपल्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओज पाहू शकतील. विद्यार्थ्यांना विविध कॉलेजमधील ८० हजारपेक्षा जास्त शैक्षणिक पर्यायांची माहिती अ‍ॅपवर मिळणार आहे.

- Advertisement -

‘हेल्पलाईनवर मिळणार समुपदेशन
समुपदेशकांसोबत बोलण्यासाठी ८६००२४५२४५ हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध केला आहे. हेल्पलाईनवर फोन करून विद्यार्थी करिअर समुपदेशकाशी बोलू शकतात. तसेच राज्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समुपदेशकांशीही विद्यार्थी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून याच अहवालाद्वारे करिअर विषयक मार्गदर्शन घेऊ शकतील.

विभाग         विद्यार्थी संख्या
पुणे              1,92,662
मुंबई            1,80701
नाशिक          1,59,457
औरंगाबाद      1,42,052
अमरावती       1,29,687
कोल्हापूर       1,22,059
नागपूर          1,20,544
लातूर            84,536
कोकण          25, 634
………………………………
एकूण           11,57,332

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -