घरमुंबईपालघर उपकेंद्राच्या जागेचा तिढा सुटणार

पालघर उपकेंद्राच्या जागेचा तिढा सुटणार

Subscribe

जिल्हाधिकारी 20 ते 25 एकर जागा देण्यास सकारात्मक

अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालघरमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेचा तिढा आता लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे. उपकेंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या 100 एकर जागेपैकी 20 ते 25 एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सकारत्मकता दर्शवली आहे. आदिवसाी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाकडून पालघरमध्ये उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पालघरमध्ये उपकेंद्र सुरू करण्यासाठी 100 एकर जागा मुंबई विद्यापीठाकडून शोधण्यात येत होती. जागा मिळण्यात अडचणी येत असल्याने उपकेंद्राचे काम रखडले होते. पालघरमध्ये जागा उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी तीन वेळा पालघर जिल्ह्याचा दौरा केला. परिणामी उपकेंद्राला 100 एकर जागा नव्हे तर किमान 20 ते 25 एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबात पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सकारत्मकता दर्शवल्याने उपकेंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच लोकसभा व विधानसभेच्या आलेल्या निवडणुका व जिल्हाधिकार्‍यांची झालेली बदली यामुळे जागा मिळण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे आता नव्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन ही जागा उपलब्ध करून घेत लवकरच उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याची व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा गावाला जातात, तर अनेक विद्यार्थ्याना अन्य विद्यापीठाचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी व्हावा व त्यांच्या जिल्ह्यातच त्यांना शिक्षण व अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पालघरमध्ये उपकेंद्र सुरू झाल्यास तेथील आदिवासी मुलांची शिक्षणासाठी होणारी फरपट कमी होईल. उपकेंद्रातून विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे शिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याची व शिक्षण सोडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, अशी माहितीही कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -