घरमुंबईदोन महिन्याच्या मुलीवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया

दोन महिन्याच्या मुलीवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया

Subscribe

वाडिया रुग्णालयात नवजात कन्येवर हायब्रिड नॉरवूड सर्जरी ही अत्यंत गुंतागुंती शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने या चिमूरडीला पुन्हा जीवनदान मिळाले आहे. 

वाडिया रुग्णालयात सर्जरी टीमने अवंतिका या नवजात कन्येवर हायब्रिड नॉरवूड सर्जरी ही अत्यंत गुंतागुंती शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. कल्याणमध्ये राहणाऱ्या अवंतिकाच्या हृदयात हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिन्ड्रोम (एचएलएचएस) हा दोष निर्माण झाला होता. संपूर्ण पश्चिम भारतात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे बी. जे. वाडिया हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे. वाडिया रुग्णालयातील पीडियाट्रिक इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. श्रीपाल जैन, बालहृदयशल्यचिकित्सक डॉ. बिस्वा पांडा, बालहृदयरोग भूलतज्ज्ञ डॉ. विल्सन सी., पडियाट्रिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जयश्री मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने या चिमुरडीला पुन्हा जीवनदान मिळाले आहे.

काय आहे प्रकरण

बाळाच्या आई धन्या नायर या गरोदर असतानाच त्यांच्या बाळामध्ये हृदयदोष असेल अशी शंका डॉक्टरांनी वर्तवली होती.  नवरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयात जाण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर त्यांची फेटल इकोकार्डिओग्राफी ही अल्ट्रासाउंड चाचणी करण्यात आली. ही चाचणी केल्यावर गर्भाला हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिन्ड्रोम (एचएलएचएस) हा हृदयदोष असल्याचे निष्पन्न झाले. यात बाळाच्या हृदयाच्या डाव्याबाजूकडील रचना अविकसित असल्याचे आढळून आले होते. या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात आले.

- Advertisement -

या बाबत माहिती देतांना डॉक्टर श्रीपाल जैन म्हणाले की,”गंभीर स्वरुपाच्या हृदयोषामुळे बाळाला जन्मानंतर तातडीने आयसीयूत दाखल करण्याची आवश्यकता असेल, असे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे इतर अवयवांना हानी पोहोचू नये यासाठी बाळावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, हे निश्चित झाले. दोन्ही पालकांना बाळाच्या परिस्थितीबद्दल कल्पना देण्यात आली आणि भावी आयुष्यात निळे व गुलाबी रक्ताच्या रक्ताभिसरणासाठी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असे सांगण्यात आले. आईच्या आरोग्याचा बारकाईने पाठपुरावा करण्यात आला आणि गर्भाच्या प्रकृतीवरही बारीक लक्ष ठेवण्यात आले. नवरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयात प्रसूती झाली आणि बाळाला लगेचच बीजेबड्ल्यूएचसीमच्या निओनॅटल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. हृदयदोषाचे निदान करण्यासाठी विस्तृत इकोकार्डिओग्राफी करण्यात आली. बाळाला जिवंत ठेवणारी रक्तवाहिनी बंद होऊ नये यासाठी मेडिकेशन ड्रिप सुरू करण्यात आले. या प्रकरणाचे विस्तृत मूल्यमापन केल्यानंतर आणि संपूर्ण टीमच्या चर्चेनंतर आणि बाळाचे कमी वजन लक्षात घेता बाळावर हायब्रिड नॉरवूड सर्जररी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.”

“बीजेडब्ल्यूएचसीमध्ये आतापर्यंत हृदयदोष असलेल्या ८०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. इतकी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणारे पश्चिम भारतातील हे एकमेव हॉस्पिटल असावे. या केसचे वैशिष्ट्य हे की, बाळाच्या प्रकृतीचे व्यवस्थापन त्याच्या जन्माच्या आधीपासून करण्यात आले. वाडिया हॉस्पिटलमध्ये नियमितपणे बाळांसाठी हृदयचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात येते. हृदयदोष असलेल्या बालकांचे निदान करून त्यांना वेळेवर उपचार मिळतील, याची खातरजमा करण्यात येते. त्यामुळेच गुंतागुंतीच्या हृदयदोषांवर उपचार करण्यासाठी वाडिया हॉस्पिटल हे आदर्श प्रसूती आरोग्य केंद्र ठरते.”- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया हॉस्पिटल 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -