घरCORONA UPDATEपालिकेच्या केंद्रीय बोर्डाची पहिली ऑनलाईन सोडत यशस्वी 

पालिकेच्या केंद्रीय बोर्डाची पहिली ऑनलाईन सोडत यशस्वी 

Subscribe

सीबीएसईसाठी १५१० तर आयसीएसईसाठी अवघे ३३२ अर्ज आले. त्यामुळे सीबीएसईच्या ज्युनिअर केजी ते सहावीपर्यंतच्या तर आयसीएसईच्या ज्युनिअर केजी ते पहिलीपर्यंतच्या वर्गासाठी सोडत काढण्यात आली.

पालिका क्षेत्रातील दुर्बल घटाकातील विद्यार्थ्यांना सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांच्या प्रवेशाची सोडत गुरुवारी ऑनलाईन काढण्यात आली. यावेळी सीबीएसईसाठी १५१० तर आयसीएसईसाठी अवघे ३३२ अर्ज आले. त्यामुळे सीबीएसईच्या ज्युनिअर केजी ते सहावीपर्यंतच्या तर आयसीएसईच्या ज्युनिअर केजी ते पहिलीपर्यंतच्या वर्गासाठी सोडत काढण्यात आली.

जोगेश्वरी येथील पूनम नगर मनपा शाळेमध्ये भरणाऱ्या सीबीएसई शाळेसाठी २१५४ अर्ज आले होते. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यातील ६४४ अर्ज बाद झाल्याने ३०८ जागांसाठी तब्बल १५१० अर्ज सोडतीसाठी उपलब्ध झाले. तसेच माहीम येथील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरु करण्यात आलेल्या आयसीएसई शाळेसाठी पालकांचा सीबीएसईच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. आयसीएसई शाळेसाठी अवघे ३६० अर्ज आले. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यातील २८ अर्ज बाद ठरल्याने ३३२ अर्जातून सोडत काढण्यात आली. दोन्ही शाळांमध्ये ज्युनिअर केजी ते सहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाची पटसंख्या ३८ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तुकडीला ३८ पेक्षा जास्त अर्ज असतील त्याच तुकड्यांची सोडत काढण्यात आली. त्यामुळे सीबीएसईच्या प्रत्येक तुकडीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ज्युनिअर केजी ते सहावीपर्यंतच्या सर्व वर्गांसाठी सोडत काढण्यात आली. याउलट आयसीएसईच्या ज्युनिअर केजी ते पहिलीच्या वर्गासाठीच ३८ पेक्षा जास्त अर्ज असल्याने या तीन वर्गांसाठीच सोडत काढण्यात आली. सोडतीसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, काही पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

सोडतीमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांनी त्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी १० मेपर्यंत ऑनलाईन गूगल अर्ज भरायचा आहे. या दोन्ही शाळा जूनमध्ये सुरु होणार होते. परंतु सध्या राज्यात पसरलेल्या कोविड- १९ची परिस्थिती पाहता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या लक्षात घेता पालिकेकेने आयसीएसई आणि सीबीएसई मंडळाच्या शाल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांचे हे पहिले वर्ष असून, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पालिकेकडून मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे. तसेच या शाळांमध्ये मराठी हा विषय बंधनकारक असणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे मुंबई पब्लिक स्कुल, माहीम आणि जोगेश्वरी (पूर्व) येथे सुरु होणाऱ्या आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांसाठी गुरुवारीऑनलाईन सोडत प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आजवर कुठल्याही खाजगी शाळेत अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया झाली नसेल इतकी पारदर्शकता मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पाळण्यात आली आहे.

– साईनाथ दुर्गे, शिक्षण समिती सदस्य, मुंबई महापालिका

- Advertisement -

इयत्ता               जागा     सीबीएसई  आयसीएसई

ज्युनिअर केजी        ३८          ३४६            १०६

सिनिअर केजी        ३८           ३६०              ४५

पहिली                  ३८           २६७              ६२

दुसरी                   ३८           १४६               २९

तिसरी                  ३८            १४१              २७

चौथी                    ३८            ९५                १४

पाचवी                  ३८            ९५                २१

सहावी                  ३८            ६०                २८

एकूण                  ३०४         १५१०           ३३२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -