घरमुंबई'त्याच्या' तोंडातून डॉक्टरांनी काढली ५ सेंमीची गाठ

‘त्याच्या’ तोंडातून डॉक्टरांनी काढली ५ सेंमीची गाठ

Subscribe

मुंब्र्यात राहणाऱ्या एका तरुणाच्या तोंडातून गाठ काढण्यास दंत शासकीय हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलं आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून तोंडातील उजव्या बाजूच्या हाडामध्ये आलेल्या गाठीला दंत शासकीय हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलं आहे. मुंब्र्यात राहणारा हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून तोंड उघडू शकत नव्हता. त्याच्यावर सीएसएमटी इथे असणाऱ्या शासकीय दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानुसार, त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याचं तोंड कायमस्वरुपी खुलं केलं आहे.

गाठ काढण्यास डॉक्टरांना यश

तीस वर्षीय इमरान खान याच्या तोंडात सहा महिन्यांपासून हाडाला लागून असलेली गाठ होती. पण, ही गाठ नेमकी कशाची होती? हे त्याला कळतंच नव्हतं. गाठ वाढू लागल्याने त्यांना तोंड उघडायला त्रास जाणवू लागला होता. शिवाय, कोणतेही व्यसन नसताना अशा प्रकारची गाठ येणं यावरुन त्याच्या मनात एक प्रश्न घर करु लागले. त्याने तात्काळ दंत महाविद्यालयात धाव घेतली. शिवाय, तोंड उघडता येत नसल्याने त्याला काहीही खाता-पिताना त्रास होत होता. त्यामुळे त्याच्याकडे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता.

- Advertisement -

या रुग्णावर गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्याला रोज एक इंजेक्शन दिलं जात होतं. किमान चार ते पाच वेळा हे इंजेक्शन त्याला दिलं गेलं. पण, फरक पडत नव्हता. शिवाय, आता त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आहे. त्याच्या तोंडातून ५ सेमीची गाठ काढण्यात आली आहे. चेहऱ्याचं हाड काढल्याने ग्राफ्टिंग करून नवीन हाडं बसवण्यात येणार आहे. तोंडात गाठ तयार होण्यामागील मुख्य कारणं हे अनुवांशिक किंवा काही मार लागल्यामुळे असू शकतं. यासाठी मौखिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तोंडातील गाठ पटकन दिसून येत नाही. त्याचप्रमाणे गाठ वाढल्याने गाल सूजलेला दिसत असल्याने या तरुणाच्या लक्षात आलं. याकरता वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं आहे.  डॉ. कविता वड्डे, शासकीय दंत महाविद्यालयातील मुख शस्त्रक्रिया विभागाच्या सहयोगी प्राध्यापक

तोंडात गाठ असल्याने त्याला योग्य पद्धतीने तोंड उघडता येत नव्हतं. एक्स-रेच्या माध्यामातून त्याच्या तोंडाच्या उजव्या बाजूला एक गाठ असल्याचं समजलं. ही गाठ हाडाला लागून होती. गाठ कॅन्सरची असावी, असा संशय होता. त्यामुळे गाठीचा काहीसा भाग काढून तो तपासणीसाठी पाठवण्यात आला. पण ही कॅन्सरची गाठ नव्हती. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ही गाठ काढण्यात आली. या गाठीसह हाडही काढून टाकण्यात आलं. या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -