घरमुंबईअविश्वसनीय! खांद्यापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडला

अविश्वसनीय! खांद्यापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडला

Subscribe

मुंबईतील रेल्वे अपघातात खांद्यापासून वेगळा झालेला हात एका तरुणाला पुन्हा जोडण्यात कुपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे.

मुंबईतील रेल्वे अपघातात महिनाभरापूर्वी जखमी होऊन खांद्यापासून वेगळा झालेला हात एका तरुणाला पुन्हा जोडण्यात कुपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे. २८ वर्षांचा धर्मेंद्र गुजरातच्या अहमदाबादमधून मुंबईत काही कामानिमित्त आला होता. पण, अंधेरी स्थानकावर रेल्वेतून पाय घसरून पडला. त्याचा उजवा हात रेल्वेच्या चाकाखाली आला आणि त्याने आपला हात गमावला. धर्मेंद्रसोबत त्याचा मित्र ही होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मेंद्रला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तात्काळ धर्मेंद्रवर उपचार करून शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सलग सात तास चाललेल्या अवघड शस्त्रक्रियेनंतर धर्मेंद्रचा तुटलेला उजवा हात डॉक्टरांनी पुन्हा जोडून दिला. धर्मेंद्रवर जवळपास महिनाभर उपचार केल्यानंतर आता त्याचा हात हळूहळू हालचाल करु लागला आहे.

या तरुणाला अतिशय गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अपघातात हात-पाय तुटल्यानंतर रक्तप्रवाह थांबतो आणि त्यामुळे तुटलेला अवयव निकामी होऊ लागतो. त्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे गरजेचे होते. त्यानुसार, आवश्यक त्या चाचण्या करून आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेत हाताच्या तुटलेल्या रक्तवाहिन्या पुन्हा जोडण्यात आल्या आहेत. याशिवाय, हाड आणि त्वचासुद्धा बसवली गेली. या शस्त्रक्रियेला ७ तास लागले असून या तरुणावर महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तसेच धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.  – डॉ. नितीन घाग, कूपर हॉस्पिटलमधील प्लॅस्टिक सर्जन

- Advertisement -

या शस्त्रक्रियेनंतर जवळपास महिनाभराच्या उपचारानंतर धर्मेंद्रचा संवेदनाहीन झालेला हात आता पूर्वपदावर येत असून सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला आहे. साधारणपणे पुढील वर्षभरात धर्मेंद्रला पूर्वीप्रमाणे स्वतःच्या हाताने काम करता येऊ शकेल.  – डॉ. गणेश शिंदे, कूपर हॉस्पिटलचे अधिष्ठाता


हेही वाचा – ४ वर्षांच्या जस्तीकला यकृताचा कर्करोग, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

- Advertisement -

हेही वाचा – थायलंडमध्ये स्तन प्रत्यारोपण फसले; मुंबईत केली यशस्वी शस्त्रक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -