घरमुंबईमुंबई महापालिकेच्या कामांची अशीही शाळा!

मुंबई महापालिकेच्या कामांची अशीही शाळा!

Subscribe

दुय्यम अभियंत्याने २०१८-१९ मध्ये ४० कोटींची सात कामे, २०१९-२० मध्ये ८० कोटींची १० कामे अशी दोन वर्षांमध्ये तब्बल १२० कोटी रुपयांची कामे केली आहेत. पी दक्षिण, आर दक्षिण, पी उत्तर, के पश्चिम, झोन ४ आणि झोन ७ याठिकाणी एकच वेळेस दहा कामे सुरू आहेत.

पालिकेच्या अनियमित कामांवरून अनेकदा चर्चा होत असली तरी पालिकेतील दुय्यम अभियंता हे सर्व शक्तिमान असल्याप्रमाणे एकाचवेळी विविध प्रभागांमधील १० कामे करत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. शाळा दुरूस्ती पायाभूत सुविधा विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांच्या वरदहस्तानेच हे सुरू असल्याचा आरोप होत असतानाही हा अधिकारी एकाच विभागात एकाच पदावर १० वर्ष कार्यरत आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील दुय्यम अभियंता संजय काळे याने वरिष्ठांची मर्जी सांभाळून आणि ठेकेदारांशी संगनमत करून कोट्यवधींच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. दुय्यम अभियंत्याने २०१८-१९ मध्ये ४० कोटींची सात कामे, २०१९-२० मध्ये ८० कोटींची १० कामे अशी दोन वर्षांमध्ये तब्बल १२० कोटी रुपयांची कामे केली आहेत. पी दक्षिण, आर दक्षिण, पी उत्तर, के पश्चिम, झोन ४ आणि झोन ७ याठिकाणी एकच वेळेस दहा कामे सुरू आहेत. विविध विभागात असलेली ही कामे याच अभियंत्याच्या देखरेखीखाली करण्यात येत होती. त्यामुळे एकाचवेळी हा अधिकारी सर्व ठिकाणी उपस्थित राहणे शक्यच नसल्याने ठेकेदारांना निकृष्ट काम करणे सोपे झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांनी केला. दरम्यान, कामांची खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपण तक्रार करूनही पालिकेने दखल घेतली नसून, अधिकार्‍याला वाचवण्याचे काम वरिष्ठ करत आहेत का असा आरोप चव्हाण यांनी केला. यासंदर्भात संजय काळे यांना संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -