घरमुंबईरेल्वे स्थानकांवर मिळणार ताजा उसाचा रस

रेल्वे स्थानकांवर मिळणार ताजा उसाचा रस

Subscribe

प्रवाशांच्या आरोग्यासाठी आयआरसीटीसीचा पुढाकार

मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्थानकांवर नुकतेच दुषित लिंबू सरबत प्रकरणानंतर रेल्वे स्थानकांवरील मिळणारे लिंबू सरबत पूर्ण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून सुटका करण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या ऊसाच्या रसाच्या स्टॉलवर धावत घेत होते. मात्र आता ‘रेल्वे कॅटिरींग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (आयआरसीटीसी)ने रेल्वे प्रवाशांना उन्हाळ्यात ऊसाचा ताजा थंड रस मिळावा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक स्वयंचलित ऊसाच्या रसाची मशीन लावण्यात आली आहे. ज्यात मुबलक दरात प्रवाशांना ताजा व थंड ऊसाचा रस मिळणार आहे. त्याची सुरुवात मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून झाली आहेत.

उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते,ते म्हणजे उसाचा रस.उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही औरच असते. त्यासाठी हा आरोग्याला फायदेशीर ठरणार उसाचा रस आता रेल्वे स्थानकांवर मिळणार आहे. या पूर्वी रेल्वे प्रवासी गाडीतून उतरताच उसाचा रस पिण्याकरिता रेल्वे स्थानकाबाहेर जावे लागत होते. मात्रा आता रेल्वे कॅटिरगअँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (आयआरसीटीसी)ने रेल्वे स्थानकांवरच प्रवाशांना उसाचा रस उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- Advertisement -

सद्या पश्चिम रेल्वेच्या मार्गवरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर आयआरसीटीसी फूड ट्रॅकवर हा उसाचा रस उपलब्ध करून देण्यांत आला आहे. आयआरसीटीसीने उसाचा रसासाठी अत्याधुनिक स्वयंचलित मशिन लावण्यांत आली आहे. ज्यामध्ये फक्त ग्लास लावायची गरज असते. बट दाबताच उसाचा ताजा रस प्रवाशांना मिळेल. आयआरसीटीसीने २०० एमएल उसाच्या रसाची किमंत फक्त ३० रुपये ठेवण्यात आली आहे. या मशिनची किमंत २ लाख १० हजार रुपये आहेत. याला मागील काही दिवसापासून रेल्वे प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांना आरोग्यासाठी फायदेशीर
उन्हाळ्यात ऊसाचा ताजा थंडा रस फक्त गर्मीपासून बचाव करत नाही तर बर्याच आजारपणापासून दूर ठेवतो. याचे सेवन केल्याने भरपूर ऊर्जा मिळते. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील उत्तम असतो. हा रस प्रवास दरम्यान डीहायड्रेशनपासून बचाव करतो. त्याचे अनेक फायदे प्रवाशांना मिळावेत म्हणून रेल्वे कॅटिरगअँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड उसाचा रस सुरु केला आहे. सद्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवरीही मशिनी सुरु केली आहे. मात्र टप्याटप्यानी यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. अशी माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहेत.

- Advertisement -

कुर्ला येथील लिंबू सरबत प्रकरणानंतर मध्य रेल्वेने सर्व रेल्वे स्थंकावरील लिंबू सरबत बंद केले होते. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेने सुद्धा शहरातील २४ विभागांमधील लिंबू सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे विकणार्‍या गाडयांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यातील ९० टक्के गाडयांवर निकृष्ट दर्जाचा बर्फ वापरल्याचे तपासणीतून उघडकीस आले आहे, तर पालिकेने २५४ उसाच्या रसवंतीगृहाची पाहणी केली होती. त्यातून २३६ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ९३ टक्के रसवंतीगृहामध्ये अयोग्य दर्जाचा रस असल्याचे या तपासणी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आहेत. अशा परिस्थिती रेल्वे प्रवाशांना आरोग्याची काळजी घेत आयआरसीटीसीने उसाचा ताजा थंडा रस उपलब्ध करून देण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकते.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -