घरमुंबईVideo : पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न

Video : पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

नैराश्येतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कळंबोली येथे घडली आहे. या घटनेमध्ये त्या व्यक्तीला वाचवणारे पोलीस देखील जखमी झाले आहेत.

कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून एक व्यक्ती आत्महत्येच्या प्रयत्नात होती. तीन मजली इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर चढून ही व्यक्ती बसली होती. मात्र, एका पोलिसांने शिताफीने त्याच्यावर झडप टाकून स्वतःसह त्याला टेरेसवर झोकून दिले. यामध्ये नैराश्यात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले असून त्याला वाचवणारे पोलीस जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोलीस मुख्यालयाच्या तीन मजली इमारीवर एक व्यक्ती चढली होती. ही व्यक्ती टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात होती. याची माहिती मिळताच कळंबोली पोलीस तसेच मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. समजूत काढून देखील तो खाली उतरत नसल्याने त्याने खाली उडी टाकल्यास अलगत पकडण्याची तयारी पोलिसांनी केली होती. मात्र, त्यातही अधिक धोका होता. त्यामुळे टेरेसवर गेलेल्या पोलिसांनी एका बाजूने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठीमागून पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीवर झेप टाकून स्वत:सोबत त्याला टेरेसवर झोकून दिले. याप्रकरणी सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती मूळची बीडची असून त्याच्या नैराश्याचे कारण कळू शकलेले नाही. योगेश चांदणे (३०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर क्यूआरटीचे पोलीस शिपाई स्वप्नील मंडलिक यांनी त्यांचे प्राण वाचवले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – राज्यात चार वर्षांत १२ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

- Advertisement -

हेही वाचा – ओव्हरहेड वायरला हात लावून केला आत्महत्येचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -