घरक्राइमकांदिवलीत दोन मुलांसह वडिलांची गळफास लावून आत्महत्या

कांदिवलीत दोन मुलांसह वडिलांची गळफास लावून आत्महत्या

Subscribe

शेख कुटुंबीय गेल्या काही दिवसापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होत

कांदिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्याआधी वडिलांनी सुसाइट नोट लिहिली. कुटुंबाला आर्थिक चणचण असल्याने त्यांनी आपले जीवन संपवत आहे, असे त्यांच्या सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वडील अजगर अली शेख (45), मुलगी कोनेन शेख(12) आणि सुजेन शेख (7) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अजगर शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मुलांना त्यांनी विषारी पदार्थ देऊन त्यांचही जीवन संपवलं अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

- Advertisement -

आत्महत्येपूर्वी अजगर शेख यांनी एक सुसाईड नोट लिहिली. त्यात असणाऱ्या माहितीनुसार शेख कुटुंबीय गेल्या काही दिवसापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते त्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून कांदिवली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवरीने गळफास लावून संपवले आयुष्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -