घरमुंबईआरक्षणासाठी माथाडी तरुणाची आत्महत्या

आरक्षणासाठी माथाडी तरुणाची आत्महत्या

Subscribe

दोन लाख रुपये कर्ज मंजूर होऊनही ते मिळत नसल्याने हताश झालेल्या माथाडी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी तुर्भे मधील एपीएमसी मार्केटमध्ये घडली. अरुण जगन्नाथ भडाले असे या तरुणाचे नाव आहे.

दोन लाख रुपये कर्ज मंजूर होऊनही ते मिळत नसल्याने हताश झालेल्या माथाडी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी तुर्भे मधील एपीएमसी मार्केटमध्ये घडली. अरुण जगन्नाथ भडाले असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिट्ठी लिहिली असून त्यात फडणवीस सरकार आम्हाला काही आरक्षण देऊ इच्छित नाही, मग आम्ही करायचे काय? फाशी घेतल्या शिवाय पर्याय नाही, असे नमूद केले आहे. शनिवारी पहाटे अरुणने राहत्या ठिकाणी गळफास घेतला. अरुणच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याच्या पुणे -भोर या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेला आहे.

माथाडी कामगार असलेल्या अरुणने कलकत्तामध्ये असलेल्या श्रीराम सिटी फायनान्स या कंपनीत २ लाख रुपये कर्जासाठी प्रयत्न सुरू केला होता. त्याने बँकेला ऑनलाईन कागदपत्रे सादर केले असता त्याला २ लाख रुपये कर्ज मंजूर झाले. मात्र ते मिळण्यासाठी त्याला अनेक प्रकारचे चार्ज भरायचे होते. अरुणने कंपनीच्या सतीश नामक व्यक्तीकडे २ हजार ६०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्या नंतर पुन्हा अरुणकडे ११ हजार रुपये करारनामा करण्यासंबंधी मागण्यात आले. कर्ज देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक होत असल्याचे अरुणच्या लक्षात आले. श्रीराम सिटी फायनान्स या कंपनीचे मुंबईत कोणतेही कार्यालय नसून त्याचे मुख्य कार्यालय कोलकातामध्ये आहे. कर्जासंबंधी सर्व व्यवहार हे ऑनलाईन केले जातात. त्यामुळे अरुण जास्तच तणावात होता. या संबंधी त्याने शुक्रवारी कोपरखैरणे मध्ये राहणार्‍या त्याच्या नातेवाईकाची रात्री ८ च्या सुमारास भेट घेतली. त्याने कर्ज मिळत नसल्याची खंत त्यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यानंतर तो थेट राहत्या ठिकाणी आला आणि शनिवारी पहाटे आत्महत्या केली.

- Advertisement -

फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही

श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने कर्ज देतो सांगून माझी फसवणूक केली आहे. त्याचबरोबर फडणवीस सरकार आम्हाला काही आरक्षण देऊ इच्छित नाही, मग आम्ही करायचे काय, फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही, ९ ऑगस्ट ला होणार्‍या मराठा समाजाचा मोर्चा हा फडणवीस यांच्या घराकडे न्या. दोन वर्ष झाले तरी आम्हाला आरक्षण मिळाले नाही.
मी आरक्षणासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे. सरकारकडून काहीही होत नसल्याने आता मला फाशी घेतानाहीही लाज वाटत आहे. बाहेरचे गुजराती, मारवाडी येऊन आपल्या ठिकाणी व्यवसाय करतात. आपण त्यांच्याकडे माल खरेदी करतो. तो एक रुपयापण कमी करत नाही. मी फाशी घेतल्यानंतर तत्काळ माझ्या भावाला कळवा आणि माझ्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू नका, असा मचकूर भडाले यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याजवळ असलेल्या चिठ्ठीत लिहलेला होता.

अरुण भडाले ने आमच्या श्रीराम सिटी फायनान्स या कंपनीत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता.त्यानुसार त्याला २ लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते. कर्ज मजूर झाल्यानंतर अगोदर काही चार्जेस कंपनीत जमा करावे लागतात. त्यानुसार त्याला ११ हजार रुपये करारनामा करण्यासाठी भरण्यास सांगितले. आम्ही त्या संबंधी त्याच्याकडे पाठपुरावा करत होतो.
विक्रांत साहू, मॅनेजर,श्रीराम सिटी फायनान्स (कोलकाता)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -