घरमनोरंजन'पंचतारांकीत हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का?'

‘पंचतारांकीत हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का?’

Subscribe

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने खूप प्रयत्न केले. यावेळी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. तिन्ही पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. यावर अभिनेता सुमित राघवनने खोचक टीका केली आहे. सत्ता स्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का, असा सवाल अभिनेता सुमित राघवनने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

सुमितने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ट्रायडंट,रेनेसन्स,ललित,हयात या हॉटेल्स शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवण्यात आले होते. पण या हॉटेल्सच्या मेनू कार्डमधून मात्र खिचडी हा पदार्थ या आधीच वगळण्यात आला आहे. पण आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार? बहुधा शेतकरी’, असा उपरोधिक टोला सुमितने लगावला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना आमदारांचा मुक्काम हॉटेल रिट्रीटमध्ये हलविण्यात आला होता. हॉटेल रिट्रीटनंतर शिवसेनेच्या आमदारांना हॉटेल ललितमध्ये नेण्यात आलं होतं. तर आमदारांचा घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने आपले आमदार जुहूच्या जे. डब्लू. मॅरिएटमध्ये ठेवले होते. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना ठेवण्याची व्यवस्था पवई येथील रिनेसन्स हॉटेलात केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -