Mega Block : मुंबईकरांनो रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

mumbai local mega block update Mega Block on Central and Harbor line
Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवार १५ मे रोजी मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सुद्धा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यानच्या कालावधीत रेल्वेरुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातील. या कामांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.

मेगाब्लॉकचा मध्य रेल्वेवर होणारा परिणाम =

मध्य रेल्वेच्या ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरच्या धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. देखभाल, दुरुस्तीच्या कामांमुळे रविवारी या लोकलफेऱ्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

मेगाब्लॉकचा पश्चिम रेल्वेवर होणारा परिणाम –

पश्चिम रेल्वे ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मेगाब्लॉकचा हार्बर रेल्वे मार्गावर होणारा परिणाम –

हार्बर रेल्वे ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरच्या धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मुंबई लोकल फेऱ्यांची वेळ =

मध्य रेल्वे –

स्थानक – माटुंगा ते मुलुंड

मार्ग – अप आणि डाऊन धीमा

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५

पश्चिम रेल्वे –

स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

मार्ग – अप आणि डाऊन जलद

वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी ३. ३५

हार्बर रेल्वे –

स्थानक – सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

या वेळांमध्ये तिन्ही मार्गांवर मुंबई रेल्वे लोकल धावतील.