Corona : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह

ncp leader sunil tatkare gets death threat letter by an anonymous

राज्यातील आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काल, सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. ते उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. सुनील तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये 

माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. सुनील तटकरे मुंबईतील कोरोना रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.

दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून अजित पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना थकवा आणि कणकण जाणवत होती. त्यामुळे अजित पवार घरातच क्वारंटाईन झाले होते. तसेच त्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणीदेखील केली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती. पंरतू आता पुन्हा एकदा अजित पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती पॉझिटिव्ह आल्याचे समजते.

हेही वाचा –

पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED चा स्फोट; ७ जणांचा मृत्यू तर ७० जखमी