घरमुंबईकल्याण लोकसभा मतदार संघात सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे केवळ वल्गनाच!

कल्याण लोकसभा मतदार संघात सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे केवळ वल्गनाच!

Subscribe

कल्याण लोकसभा मतदार संघात कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंतचा संपूर्ण परिसर येतो. मात्र या परिसरातील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक विकास का भकास असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंतचा परिसर हा कल्याण लोकसभा मतदार संघात येतो. शहरी आणि ग्रामीण भागात हा परिसर पसरला आहे. मात्र इथली आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. पालिकेची रूग्णालये आजारी अवस्थेत आहेत. त्यामुळे इथल्या रूग्णांना नेहमीच मुंबईचीच वाट धरावी लागते. महापालिकेची निवडणूक असो, वा आमदार खासदारकिची निवडणूक सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे आश्वासन प्रत्येक निवडणूकीत जनतेला दिले जाते. कित्येक वर्षे या परिसरात शिवसेना, भाजपची सत्ता असतानाही सुपर स्पेशालिटी रूगणालयाचे केवळ वल्गनाच ठरल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यात एकही सुपर स्पेशालिटी रुग्णालय नाही

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकसभेत कल्याणचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. डॉक्टर असलेले खासदार कल्याणला लाभल्याने सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे स्वप्न साकार होईल, अशी एक जनतेची अपेक्षा होती. पण गेल्या पाच वर्षात या अपेक्षेचा भंग झाला आहे. मध्यंतरीच्या काळात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य मंत्रीपद आले. पण त्यांच्या मंत्रीपदाचाही फायदा इथल्या जनतेंला झाल्याचे दिसत नाही. कल्याण, ठाण्यात एकही सुपर स्पेशालिटी रुग्णालय होऊ शकलेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याणात रूक्मिणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन रूग्णालये आहेत. मात्र अपुरी डॉक्टरांची संख्या आणि साधनसामुग्रीची ही समस्या या रूग्णालयातही आहे.

- Advertisement -

रूग्णालयात ७४ पदे रिक्त

शास्त्रीनगर रूग्णालयात दररोज पाचशेच्या आसपास रूग्ण येतात. शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातून येणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे. तर रूक्मिणीबाई रूग्णालयातही दररोज पाचशेच्या अधिक रूग्ण येतात. महिला प्रसुतीसाठी मोठया प्रमाणात येत असतात. मात्र बाळाला काचपेटीची गरज भासल्यास ही सुविधा नाही. त्यामुळे लहान बाळांना खासगी रूग्णालयात न्यावे लागते. रूग्णालयात डॉक्टरांपासून ते शिपाईपर्यंत एकूण ७४ पदे रिक्त आहेत. रिक्तपदं लवकरच भरणार, असे एकमेव उत्तर पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून दिले जाते. कल्याण उल्हासनगर अथवा अंबरनाथ या परिसरात एकही सुपर स्पेशालिटी रूग्णालय नाही. पालिकेच्या असलेल्या रूग्णालयाची अवस्थाही बिकट आहे. प्रत्यक्षात इथल्या रूग्णाला खासगी रूग्णालयाची अथवा मुंबईची वाट धरावी लागते. त्यामुळे गोरगरीब रूग्णांना जीव गमवावा लागत आहे.

उल्हासनगरमधील जीर्ण झालेल्या कामगार रूग्णालयाच्या पूर्नविकासासाठी केंद्राकडून १२५ कोटीरूपये मंजूर करण्यात खासदारांना यश आले असले तरी प्रत्यक्षात इमारत उभी राहण्यास आणि सुविधा मिळण्यास तीन ते चार वर्षाचा काळ जाणार आहे. सध्या इथल्या जनतेला आरोग्य सोयीसुविधा पुरविण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रत्येक निवडणुकीत सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे आश्वासन जनतेला दिले जाते, यंदाच्या प्रचारातही हेच आश्वासन मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हे वाचा – लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी 3 लाख शाईच्या बाटल्या!

हे वाचा – ‘उरलेली चड्डी पण काढून घेण्यात येईल’; मुख्यमंत्र्यांच्या टीकेला मनसेचे उत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -