घरमुंबईविक्रोळीत उभारणार सुपरस्पेशालिस्ट रुग्णालय

विक्रोळीत उभारणार सुपरस्पेशालिस्ट रुग्णालय

Subscribe

विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील महापालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय लवकरच सुपरस्पेशालिस्ट होणार आहे. रुग्णालयाच्या जागी १० माजली अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यास पालिका उपायुक्तांनी परवानगी दिल्याचे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी सांगितले.सुपरस्पेशालिस्ट रुग्णायल उभारण्यासंदर्भात नुकतीच महापालिकेमध्ये झालेल्या बैठकीला प्रभाग क्रमांक ११८ चे नगरसेवक उपेंद्र सावंत, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक विद्या ठाकूर, महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा शर्मा आदी उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने तिची डागडुजी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. मात्र या रुग्णालयाच्या जागेवर सुपरस्पेशालिस्ट रुग्णालय उभारण्यात येत असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत असे. परंतु अनेक वर्षांपासून विक्रोळी,कांजूरमार्ग, पवई, भांडुप येथील नागरिकांना फक्त आश्वासन देण्यात येत होते. त्यातच कन्नमवार नगरमध्ये उभारलेल्या सुश्रुषा रुग्णालयामुळे हे रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुश्रुषा रुग्णालयाला विरोध केला. परंतु आता लवकरच महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या जागेवर १० मजली ३१० खाटांचे सुपरस्पेशालिस्ट रुग्णायल उभारण्यात येणार आहे. यामध्ये स्वतंत्र प्रसूती विभाग, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू यासह अनेक अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे रुग्णालय सज्ज असणार आहे.

- Advertisement -

रुग्णालय उभारणीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच रुग्णालयातील काही विभाग विक्रोळीतील टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृहात तर काही विभाग पवई येथील पालिकेच्या सनसिटी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. तसेच विक्रोळी व कांजूरमार्ग परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालय कर्मचारी व वैद्यकीय अधिकाèयांच्या पाडलेल्या निवासस्थानाच्या इमारतीच्या जागेवर काही महत्वाच्या सुविधांसाठी केबिन उभारण्यात येणार आहे. रुग्णालय उभारण्याबाबत लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी दिली.

कामाला लवकरच सुरूवात

- Advertisement -

सुपरस्पेशालिस्ट रुग्णायल उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून हा प्रस्ताव पालिकेच्या आर्किटेक्चर विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल.
– डॉ. उषा शर्मा, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -