चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या मी त्याचा इतका विचार करत नाही

Supriya Sule's reaction to Sharad Pawar's presidential candidature

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मध्य प्रदेश सरकाला ओबीस आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. या विषयावर भाजपने मोर्चा काढत निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विधानावर उत्तर देताना शेरेबाजी केली होती. याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा – आशिर्वाद घेण्यासाठी शरद पवारांची भेट : संजय राऊत

चंद्रकांत पाटील काय म्हणाले –

ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचे उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. याला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) यांनी स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – भाजपकडून पियूष गोयल आणि सहस्त्रबुद्धे यांना उमेदवारी निश्चित, धनंजय महाडिक तिसरे उमेदवार?

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया –

यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे सरकार दडपशाहीचे नाही. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असे वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावे, तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यात गैर काय आहे? त्यांना वाटले, ते बोलले. मी त्याचा इतका विचार करत नाही आयुष्यात, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.