घरCORONA UPDATECoronaVirus: मुंबईतील ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण

CoronaVirus: मुंबईतील ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण

Subscribe

४ हजार ३१२ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळून आले आहे.

‘कोरोना कोविड-१९’चा धोका सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे त्या दृष्टीकोनातून मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वेक्षणात दोन दिवसांमध्ये सुमारे ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये  ४ हजार ३१२ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळून आले आहे. तर यापैकी १०४ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे या ज्येष्ठांना प्राणवायू उपचार पध्दती अर्थात ‘ऑक्सिजन थेरपी’ देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना कळवले आहे.

‘कोरोना कोविड- १९’ या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थॉयराईड विषयक आजार, अनियंत्रित दमा यासारख्या बाबी आहेत, त्यांना ‘कोरोना कोविड- १९’ या आजाराचा अधिक धोका संभवतो. यानुसार ‘कोरोना कोविड- १९’ या आजाराचा संसर्ग व धोका याची अधिक शक्यता असणाऱ्या व्यक्तींचा समावेश ‘कोमॉर्बिड’ गटात करण्यात येतो.

- Advertisement -

मुंबईतील आरोग्य केंद्राच्या धर्तीवर दोन आरोग्य सेविकांचे पथक तयार करण्यात आले आहे. एकूण ४०० पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य केंद्राच्या विभागातील ज्येष्ठांचे सर्वेक्षण संबंधित पथक तयार करत असते. त्यानुसार रविवारपासून हे सर्वेक्षण सुरु झाले असून दोन दिवसांमध्ये सुमारे ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या सर्वेक्षणादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना बाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास त्यानुसार वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचारही करण्यात येत आहेत.

‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी असलेली रुग्णालये

मुंबईतील काही उपनगरीय रुग्णालये ही ‘नॉन कोविड’ रुग्णालये म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये सांताक्रूझ पूर्व परिसरातील विष्णुप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वोपचार रुग्णालय,  मालाड पूर्व परिसरातील सदाशिव कानोजी पाटील मनपा सर्वोपचार रुग्णालय, बोरीवली पूर्व परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, विक्रोळी परिसरातील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड पूर्व परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रुग्णालय इत्यादी उपनगरीय रुग्णालयांच्या समावेश आहे. या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुमारे ३०० खाटा ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी आहेत. या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या जेजे समूह रुग्णालयामध्ये १०० खाटा या ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहे. याव्यतिरिक्त खाजगी रुग्णालयातील धर्मादाय खाटांचा उपयोगही या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -