घरमुंबई'तुम्ही शांत राहा, सीबीआय न्याय करेल'; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल

‘तुम्ही शांत राहा, सीबीआय न्याय करेल’; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल

Subscribe

सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्या कुटुंबीयांसहित सर्वांनी शांत रहावे, असा सल्ला देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. सुशांतची केस आता सीबीआयकडे दिली आहे. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि सीबीआयला न्याय करू द्या, असा टोला भाजप नेते शहनवाज हुसैन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. त्यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे.

काय म्हटले आहे शहनवाज हुसैन यांनी

संजय राऊत तुम्ही न्याय देण्यासाठी फारच उशीर केलाय आणि आता तुम्ही सुशांतच्या कुंटुबियांना शांत राहिल्यास, न्याय मिळेल, असा सल्ला देत आहात. आता तुम्ही शांत राहा, सीबीआय न्याय करेल, असे भाजप नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असल्याचे सांगतानाच सुशांतला खरोखरच न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याच्या कुटुंबीयांसहीत सर्वांनी शाते राहावे. पोलिसांना त्यांचा तपास करू द्यावा, असा सल्लाही भाजप नेत्याने दिला होता. तर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयला देण्यास आमचा विरोध नव्हता. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा आणि नंतर काही दुवा सुटला असेल तर सीबीआयने त्याचा जरूर तपास करावा. सीबीआयच काय जगातील कोणत्याही संस्थेने हा तपास करावा, पण आधी पोलिसांना तर तपास करू द्या, असे संजय राऊत म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आणखी एक संकट, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -