घरताज्या घडामोडीSushant Case : 'एम्स'च्या अहवालानंतर मुंबई पोलीस आयुक्त सिंह परमबीर म्हणाले...

Sushant Case : ‘एम्स’च्या अहवालानंतर मुंबई पोलीस आयुक्त सिंह परमबीर म्हणाले…

Subscribe

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ‘एम्स’च्या अहवालानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाने दिलेला आहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही तपासात समाधान व्यक्त केले होते’. मात्र, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे.

पोलिसांची करण्यात आली बदनामी

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरात संशयकल्लोळ माजला होता. तसेच सुशांतची आत्महत्या नसून खून आहे, असे देखील बोले जात होते. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा आरोप भाजपसह बॉलिवूडमधील काही मंडळीनी केला होता. तसेच सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी देखील करण्यात आली होती. अखेर हे प्रकरण सीबीआयकडे गेले होते. सुशांतचा मृत्यू हा खून आहे की आत्महत्या याचा तपास करण्यासाठी सीबीआयने एम्सची समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल दिला असून सुशांतनं आत्महत्याच केल्याचे ‘एम्स’ने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

आयपीएस अधिकाऱ्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले

‘सुशांत प्रकरणात सोशल मीडियावर केवळ शिवीगाळ केला जात होता. तसेच चुकीची माहिती पसरवली जात होती. सायबर एक्स्पर्ट याचा तपास करत आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सांगितली आहे.

दरम्यान ‘काही मीडिया हाऊसनेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवून प्रतिमा मलीन केली होती. त्यांच्या विरोधात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर येत्या ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टही यावर योग्य निर्णय देईल’, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -