घरमनोरंजनLockDown: मुंबईत १४ व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

LockDown: मुंबईत १४ व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्यासाठी मॅनेजरचे काम पाहिलेल्या दिशा सालियान यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री उशीरा मुंबईतील मालाड परिसरात एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यावेळी दिशा तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मालाड पश्चिमेच्या एका इमारतीत १४ व्या मजल्यावर उपस्थित होती. घटनेनंतर तिला बोरिवली येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिशाचे आई-वडिल यांचे स्टेटमेंट घेतले असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचेही ते स्टेटमेंट घेणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दिशाने जनसंपर्क अधिकारी म्हणून करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी सेलिब्रिटीच्या मॅनेजरचे काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत, कॉमेडी क्विन भारती सिंग, रिया चक्रवर्ती आणि वरुण शर्मा यांसारख्या कलाकारांच्या मॅनेजरचे काम पाहिले आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सिनेमक्षेत्रातील अनेक विभागात करणाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच विविध कारणात्सव काही कलाकारांचे मृत्यूदेखील या काळात झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -