घरमनोरंजनSSR Drugs Case: एनसीबीचे आरोपपत्र दाखल, रियासह ३३ जणांचा समावेश

SSR Drugs Case: एनसीबीचे आरोपपत्र दाखल, रियासह ३३ जणांचा समावेश

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीच्यावतीने दाखल करण्यात आलेलं हे आरोपपत्र ३० हजार पानी असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने २०० जणांचे जबाब नोंदवले असून, ३० हजार पानांच्या या आरोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉपी आणि सीडीमधील पुराव्यांचा देखील समावेश आहे. एनसीबीने दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये ३३ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, सुशांत राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्जसंदर्भातील कित्येक गोष्टी समोर आल्यानंतर आता एनसीबीने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. गेले सात ते आठ महिने उलटून गेल्यानंतर देखील हा तपास अद्याप सुरूच आहे. यानंतर अनेक पुरावे हाती लागल्यानंतर एनसीबीकडून हे आरोपपत्र दाखल केले आहे. या चार्टशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण ३३ जण आरोपींची नावे आहे. यामध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचा जबाब आहे, परंतु आरोपी म्हणून नाव नाही. मात्र धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसाद, अर्जुन रामपालचा मेव्हणा अजीसीलाओस दिमिटरीटास याचेही नाव आहे अशी माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात सुशांतने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. याघटनेनंतर सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली? असा वाद सुरू असतानाच ड्रग्जचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात एनसीबीने तपास सुरू केला आणि अनेक ठिकाणी छापे टाकत एनसीबीने ड्रग्ज जप्त केले होते. तसेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटकही करण्यात आली होती.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -