घरताज्या घडामोडीसुशांतच्या अकाऊंटमध्ये होते १८ कोटी, आता शिल्लक आहेत फक्त ४.५ कोटी!

सुशांतच्या अकाऊंटमध्ये होते १८ कोटी, आता शिल्लक आहेत फक्त ४.५ कोटी!

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या मुद्द्याभोवती वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्याच्या आत्महत्येला आात राजकीय वळण देखील लागलं असून शिवसेनेच्या एका तरूण मंत्र्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या (Sushant singh rajput suicide) प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने किती जणांचे जबाब घेतले आहेत, त्याच्या मृत्यूचं कारण, रिया चक्रवर्तीचा जबाब, सुशांतच्या खात्यामध्ये असलेली रक्कम आणि काढलेल्या रकमेचे तपशील या गोष्टींचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुशांतच्या खात्यातल्या १८ कोटींपैकी फक्त ४.५ कोटी त्याच्या अकाऊंटमध्ये शिल्लक आहेत, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले पोलीस आयुक्त?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीविषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाऊंटसंदर्भात (Sushant Bank Accounts) माहिती दिली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या बँक अकाऊंटमध्ये एकूण १८ कोटी रुपये होते. पण आता त्याच्या अकाऊंटमध्ये फक्त ४.५ कोटी रुपये शिल्लक आहेत. पण त्याच्या अकाऊंटमधून रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती त्यांनी या परिषदेमध्ये दिली. दरम्यान, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या FIRमध्ये सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेतल्याचं नमूद केलं आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

आत्तापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवले

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये सुशांतचे वडिल, बहीण आणि मेहुण्याचा देखील समावेश आहे. रिया चक्रवर्तीचा दोन वेळा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी त्यांचे जबाब नोंदवले तेव्हा कोणतीही शंका उपस्थित केली नव्हती, असं परमबीर सिंग यावेळी म्हणाले.

सुशांत Bipolar Disorder आजाराने त्रस्त

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत Bipolar Disorder या मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या आजारावर तो उपचार घेत होता असंते हे म्हणाले आहेत. मात्र, सुशांतने आत्महत्या का केली? यावर अजून तपास सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -