घरमुंबईअमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या वादात सुषमा अंधारेंची एन्ट्री

अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या वादात सुषमा अंधारेंची एन्ट्री

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी (१६ मार्च) उल्हासनगरमधील बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला पोलिसांनी अटक केली. अनिक्षा प्रकरण सुरू असताना ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात काल ट्विटर वॉर रंगल्याल्याचे पाहायला मिळाले होते. आता या वादात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही एन्ट्री मारली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर चतुर्वेदी यांच्यावर आरोप करताना ‘औकात’ हा शब्द वापरला. याच शब्दावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी ट्विरट करत अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमृता फडणवीसांनी चतुर्वेदींची थेट औकात काढल्यानंतर सुषमा अंधारे यांनी काही फोटो एकापाठोपाठ ट्विट करत अमृता फडणवीसांवर ताशेरे ओढले आहेत. अंधारे म्हणाल्या की, #अमृतावहिनी बरोबर बोलतायत. खर तर खाली दिलेले फोटो बघून असे वाटते की आमची एवढी औकात कुठे की, आम्ही संपूर्ण पोलीस खाते आमच्या सेवेत तैनात करु. आमची एवढी औकात कुठे की, मुख्यमंत्री पदाचे सर्व प्रोटोकॉल तोडून आम्हीही त्यांच्या ताफ्यात सामील होऊ.

- Advertisement -

दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, आमची एवढी औकात कुठे आहे की, आम्ही एकाच वेळी गायक, मॉडेल, राजकारणी बनू आणि त्याच वेळी ट्विटही करत राहू. मग सामाजिक कार्याच्या नावाखाली चॅरिटी शो देखील करु आणि तिकीट विकण्यासाठी संपूर्ण पोलीस खात्याचाही वापर करु.

तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, आमची एवढी औकात कुठे की, आमच्या एका अर्जावर पोलिसांनी ताबडतोब आमची तक्रार घ्यावी आणि एफआयआर दाखल करून आमच्या इच्छेनुसार आरोपपत्र दाखल करावे. वहिनी आणि नंनद या नात्याने इतके लिहायची औकात आहे ना वहिनी? असा टोलाही सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस चतुर्वेदींना काय म्हणाल्या होत्या!
अमृता फडणवीसांनी ट्विटरमध्ये म्हटले की, “मॅडम चतुर्वेदी, आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी अॅक्सिस बँकेला चुकीच्या पद्धतीने फायदे आणले आहेत आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात. अर्थात तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी पैश्यांची लाच देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याकडे संपर्क साधला असता, तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती, तीच तुमची औकात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -