Homeक्राइमKhalistani Terrorist : खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकार्‍याला मानखुर्द येथून अटक; एनआयएची कारवाई

Khalistani Terrorist : खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकार्‍याला मानखुर्द येथून अटक; एनआयएची कारवाई

Subscribe

पंजाबच्या खालिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग ऊर्फ लांडा आणि गॅंगस्टर बचितर सिंग ऊर्फ पवित्र बटला याचा सहकारी असलेला जतिंदरसिंग ऊर्फ ज्योतीला याला मानखुर्द येथून राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली.

मुंबई : पंजाबच्या खालिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग ऊर्फ लांडा आणि गॅंगस्टर बचितर सिंग ऊर्फ पवित्र बटला याचा सहकारी असलेला जतिंदरसिंग ऊर्फ ज्योतीला याला मानखुर्द येथून राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. तो लखबीर सिंग ऊर्फ लांडाने तयार केलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा सदस्य असून त्याने यापूर्वी काही दशहतवाद्यांना शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला एनआयएने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (suspect related to babbar khalsa arrested from mumbai nia takes action)

लखबीर सिंग हा पंजाबचा खालिस्तानी दहशतवादी तर बचितर सिंग ऊर्फ पवित्र बटला हा कुख्यात गॅंगस्टर म्हणून परिचित आहे. या दोघांशी जतिंदरसिंग याचे चांगले संबंध होते. त्याने या दोघांसाठी शस्त्रे पुरविण्याचे काम केले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने त्यांच्या सहकार्‍यांना मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा पुरविला होता. या दोघांच्या कारवायांची एनआयएकडून चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान जतिंदरसिंग याचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तो मानखुर्द परिसरात रहात असल्याचे कळताच अधिकार्‍यांनी काही दिवसांपासून तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. अखेर सोमवारी मानखुर्द येथून जतिंदरसिंग याला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : वाल्मिक कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे तरीही मोकाटच…दमानिया आक्रमक

चौकशीत तो मूळचा पंजाबच्या गुरुदासपूरचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशचा बलजीत सिंग ऊर्फ रानभाई याच्याकडून त्याने दहा पिस्तूल, जिवंत काडतुसांचा साठा विकत घेतला होता. ही शस्त्रे त्याने लखबीर सिंग आणि पवित्र बटला याच्या सहकार्‍यांना शस्त्रे पुरविल्याची कबुली दिली. लखबीर सिंग याने बब्बर खालसा इंटरनॅशनल नावाची एक खलिस्तानी संघटना बनवली आहे. त्याचा तो सभासद असल्याचे त्याच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

येत्या काही दिवसांत तो आणखीन काही शस्त्रांची डिलीव्हरी करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच्या अटकेने शस्त्रे आणण्याची योजना फसली आहे. राजभाईच्या अटकेने पहिल्यांदाच जतिंदरसिंग याचे नाव आले होते. आरोपपत्रातही त्याचा उल्लेख होता. अनेक महिन्यांपासून तो एनआयएला गुंगारा देत होता. अखेर सोमवारी त्याला मानखुर्द येथून अटक करण्यात एनआयएला यश आले आहे. त्याची अधिकार्‍यांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीत लखबीर सिंग आणि पवित्र बटला यांच्या कारवायांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हेही वाचा – Puja Khedkar : पूजा खेडकरने देशाची प्रतिमा मलीन केली; जामीन अर्ज फेटाळताना काय म्हणाले उच्च न्यायालय


Edited by : Ashwini A. Bhatavdekar