घरमुंबईमिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रंग चित्रांच्या आविष्कारातून सजवल्या रस्त्यालगतच्या भिंती

मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रंग चित्रांच्या आविष्कारातून सजवल्या रस्त्यालगतच्या भिंती

Subscribe

कोणतेही चित्र हे हजारो भावनांचे एक प्रतिक असते. त्यामुळे या चित्रांच्या माध्यमातून मनातील अनेक भावना, सामाजिक विषय हुबेहुब जिवंत करतात येतात. त्यामुळे मुंबईतील शहरातील अनेक कळकट, मळकट भिंती आता रंग चित्रांच्या अविष्कारातून सजवल्या जात आहेत. यातून समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आता मुंबईतील SVMK च्या डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसीच्या अर्थात मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या दायित्व या सामाजिक संस्थेने केले आहे.

- Advertisement -

मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘दायित्व’ या संस्थेच्या माध्यमातून 27 फेब्रुवारी रोजी मानसिक आरोग्य जागरुकता आणि सकारात्मकता या थीमवर आधारित चित्र मुंबईतील बोरिवली पश्चिमेतील शिंपोलीच्या रस्त्यालगतच्या भिंतींवर साकारली. या भिंती चित्रांच्या माध्यामातून मानसिक आरोग्यबाबत जनजागृती करणे आणि सकारात्मकता पसरवणे हा मुख्य उद्देश होता. ‘दायित्व’ संस्थेचे हे चौथे शिबीर होते. ‘चित्र कारणासाठी’ असं या शिबीराला नाव देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी विद्यार्थ्यांनी भिंतींची स्वच्छता आणि प्राइमिंग करत शिबीरास सुरुवात केली. दायित्वचे हे बहुप्रतिक्षित शिबीर असल्याने मोठ्या उत्साहाने विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यातून शिंपोली रस्त्यालगतच्या जवळपास 25 भिंती रंगवण्यात आल्या. यात मुख्यत्वे व्यक्ती म्हणून व्यक्तीकडे पाहणे, आत्म प्रेम, शांती, प्रत्येकाचा आदर करणे, अशा अनेक संदेशात्मक गोष्टींवर चित्र साकारण्यात आली. त्यामुळे भिंतींना केवळ रंग दिला नाही, तर सामाजिक संदेश लेखनही यातून  करण्यात आले आहे.

एकूणच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे दायित्व संस्थेचे हे शिबीर यशस्वीरित्या पार पडले. मानसिक जागरुकता या मुख्य थीमवर बहुतांश चित्र रेखाटण्यात आली, ज्याला प्रेक्षकांकडूनही चांगली पोहच मिळाली, समाजात चांगले योगदान देत जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. दरम्यान ‘दायित्व’ या विद्यार्थ्यांच्या संस्थेमार्फत वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामुळे तरुण विद्यार्थ्यांच्या पुढाकारने दायित्व संस्थेच्या माध्यमातून समाज हिताची कामे केली जातात.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -