Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम 63 वर्षीय प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग; आरोपीला अटक

63 वर्षीय प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग; आरोपीला अटक

Subscribe

इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. बँकॉकहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी विमान मुंबईत उतरल्यानंतर आरोपीला अटक केली.

इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. बँकॉकहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी विमान मुंबईत उतरल्यानंतर आरोपीला अटक केली. (Swedish National Arrested In Mumbai For Allegedly Molesting IndiGo Staff)

मिळालेल्या माहितीनुसार, क्लास एरिक हराल्ड जोनस वेस्टबर्ग (63) असे या आरोपीचे नाव आहे. इंडिगोच्या विमानात जेवण सर्व्ह करताना हा प्रकार घडल्याचे समजते. या आरोपीने विनयभंग केल्याप्रकरणी 24 वर्षीय एअर होस्टेसने तक्रार दाखल केली.

- Advertisement -

या एअर होस्टेसच्या तक्रारीनुसार, 63 वर्षीय वेस्टबर्ग विमानात बसला तेव्हा त्याने मद्यप्राशन केलेले होते. विमान प्रवासादरम्यान आरोपी वेस्टबर्ग याला सीफूड खायचे होते, पण विमानात उपलब्ध नसल्याने त्याला पीडित एअर हॉस्टेसने चिकन सर्व्ह केले. तसेच त्याला पीओएसवर पेमेंट करण्यासाठी एटीएम कार्ड मागितले. त्यावेळी कार्ड स्वाईप करताना आरोपीने एअर होस्टेसचा हात पकडला. हात झटकून दूर केल्यानंतर तिने त्याला एटीएमचा पिन टाकण्याची विनंती केली.

एअर हॉस्टेसने हात झटकल्यानंतर आरोपी उभा राहिला आणि त्यानं संबंधित एअर होस्टेसचा इतर प्रवाशांसमोर विनयभंग केला, असे पडित एअर हॉस्टेसने तक्रारीत नमुद केले होते. तसेच, आरडाओरडा केला आणि त्यानं गैरवर्तन केल्याचेही पडितेने तक्रारीदरम्यान सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी आरोपीच्या वकिलाने सांगितले की, तो आजारी होता त्यामुळे त्याचे शरीर थरथरत होते. कोणतीही वस्तू तो आधाराशिवाय पकडू शकत नव्हता. त्याने पीओएस पेमेंटचे मशिन हातात पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी त्याचा एअर होस्टेसच्या हाताला स्पर्श झाला. त्याने हेतूपूर्वक तिला स्पर्श केला नव्हता.


हेही वाचा – गडचिरोलीतील अबुझमाड जंगलात पोलिसांची मोठी कारवाई; एका नक्षलवाद्याला कंठस्नान

- Advertisment -