घरCORONA UPDATEकोरोना चाचण्यांसाठी वापरणार वैद्यकीय कॉलेजांमधील यंत्रणा

कोरोना चाचण्यांसाठी वापरणार वैद्यकीय कॉलेजांमधील यंत्रणा

Subscribe

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व चाचण्या करण्यात येणार्‍या अडचणी येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय संस्था, कॉलेजांमधील यंत्रणा जिल्हा हॉस्पिटल, सरकारी लॅब यांना अतिरिक्त कोविड चाचण्या करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. ही यंत्रणा उपलब्ध केल्याने दिवसाला ६० हजार अधिक चाचण्या करणे शक्य असल्याचे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना चाचण्यांची वाढती संख्या आणि अपुरी संसाधने याचा फटका चाचण्यांवर होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटी-पीसीआर मशीनची सर्वाधिक आवश्यकता आहे. परंतु जिल्हा हॉस्पिटले व ग्रामीण भागातील अनेक प्रयोगशाळांमध्ये ही मशीन उपलब्ध नसल्याने चाचण्या करण्यामध्ये अडचणी येत आहेत. देशातील अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये संसर्ग रोगांच्या चाचण्या करण्यासाठी आरटी-पीसीआर मशीनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या अनेक विभागांमध्ये या मशीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शैक्षणिक संस्था बंद असल्याने या मशीनचा कोणताच वापर होत नाही. त्यामुळे या मशीन तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा हॉस्पिटल आणि सरकारी प्रयोगशाळेत उपलब्ध करून देण्यात आल्यास कोविड चाचणी करण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. या मशीन उपलब्ध झाल्यास देशामध्ये होणार्‍या कोरोना चाचण्यांमध्ये तब्बल ६० हजार चाचण्यांची वाढ होण्याची शक्यता यूजीसीकडून वर्तवण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता देशातील उच्च शिक्षण व संशोधन संस्थांनी त्यांच्या सल्लागारांसह आरटी-पीसीआर मशीन कोविड चाचणीसाठी तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना यूजीसीकडून देशातील सर्व विद्यापीठे व कॉलेजांना करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत या मशीन उपलब्ध करून देण्यात याव्यात असेही यूजीसीने आपल्या निर्देशामध्ये स्पष्ट केले आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -