घरCORONA UPDATEघरी, कार्यालयात व बाहेर फिरताना कोरोनापासून अशी काळजी घ्या!

घरी, कार्यालयात व बाहेर फिरताना कोरोनापासून अशी काळजी घ्या!

Subscribe

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे संचालक डॉ. देव प्रसाद चट्टोपाध्याय सांगतात की, कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही.

सध्या लॉकडाऊन ३ सुरू आहे. सरकारतर्फे लॉकडाऊन काळात दैनिक कामकाज करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. परंतु, सतर्क राहणे तितकेच गरजेचे आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे संचालक डॉ. देव प्रसाद चट्टोपाध्याय सांगतात की, कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. पुढील काही दिवसांनी कोरोना हा सामान्य फ्लू सारखा होईल. त्यामुळे याच्यासोबत राहण्याची सवय लावली पाहिजे. याच्या सवयीसाठी काही खबरदारीची पाऊल उचलू शकतो. अशाच काही पावलांची माहिती घेऊन आपले दैनंदिन जीवन सुखात घालवू शकतो.

सुरक्षा आपला अधिकार आहे

कोरोनाची लक्षण ही प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसत नाहीत. अशा या लक्षणासंदर्भात सतर्क रहने आवश्यक आहे. आपल्या आजू-बाजूची व्यक्ती कोविड-१९ वाहक असू शकते. आणि संसर्ग पसरवू शकते. तसेच तुम्ही ही कोविड-१९ चे वाहक असू शकता. त्यामुळे स्वतःला अशा प्रकारे प्रशिक्षित करा की, तुम्ही कोणाला संक्रमित करू नका आणि संसर्गजन्य होऊ नका.

- Advertisement -

ऑफिसमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा

* ई-मिटिंगला प्राधान्य द्या.

* ऑफिसमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे टाळा.

- Advertisement -

* एकदा ऑफिसमध्ये आल्यावर सारखे आत-बाहेर जाणे टाळा.

* कॉन्फरन्स रूम मीटिंगमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि कमीत कमी लोकांचा समावेश आहे.

* घरगुती जेवण खावे, आणि आपल्याच जागेवर बसून खावे. शिल्लक राहिलेल्या जेवणाची योग्य विल्हेवाट लावणे.

ऑफिसमध्ये या चार नियमांचे पालन करा

* पाऱ्यावरून ये-जा करणे.

* लिफ्टमधून जाताना सोशल डिस्टन्स ठेवणे.

* दरवाजे खोलण्यासाठी कोपऱ्याचा वापर करणे.

* लिफ्टमध्ये बटनांना, दरवाजे आणि हँडलला स्पर्श केल्यास हात सॅनिटायझरने स्वच्छ करावे.

ऑफिसमधून घरी जाताना

* आंघोळ करा.

* हात स्वच्छ धूणे

* रस्त्यात मास्क लावणे.

* चप्पल, बूट बाहेर काढणे आणि बॅगेला बाहेर ठेवणे.

घरातून सुरुवात करा

* मास्क परिधान करा.

* दररोज आपल्याजवळ सॅनिटायझर ठेवणे.

* बाहेरून आलेल्या सदस्यांनी शारीरिक अंतर ठेवणे.

* ताप आल्यावर डॉक्टरकडे जाणे.

* सार्वजनिक परिवहनचा वापर करणे.

* एसीला बंद ठेवून ताज्या हवेसाठी खिडक्या खोलून ठेवा

* सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -