घरताज्या घडामोडीदेर आये दुरुस्त आये; रेल्वे परिसरात थुंकणाऱ्या प्रवाशांवर धडक कारवाई

देर आये दुरुस्त आये; रेल्वे परिसरात थुंकणाऱ्या प्रवाशांवर धडक कारवाई

Subscribe

करोना विषाणू मुंबईसह संपूर्ण राज्यात पसरत जात आहे. हे करोना विषाणू पसरू नयेत, यासाठी रेल्वेकडून युध्द स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. इतकेच नव्हेतर आता रेल्वे परिसरात पान, मावा, गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणार्‍या प्रवाशांविरोधात रेल्वेने कारवाई अभियान सुरू केले आहे. १० दिवसांत १३८ प्रवाशांविरोधात कारवाई करत त्यांचाकडून १३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र काही असो करोना विषाणूमुळे थोड का होईना, रेल्वेला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे देर आये दुरुस्त आये असे उद्गार प्रवाशांकडून निघत आहे.

करोनामुळे थुंकणाऱ्यांवर केली कारवाई

रेल्वे परिसर असो, अथवा रेल्वेचा खिडक्या किंवा रेल्वेचे दार तिथे मावा, गुटखा, खाऊन पिचकार्‍या मारणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुध्दा मोठया प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. यासंबंधीत अनेकदा रेल्वे प्रवाशांकडून तक्रार करण्यात येत होती. मात्र पाहिजे ती कारवाई रेल्वे प्रशासनाकडून होत नव्हती. मात्र जेव्हापासून मुंबईसह महाराष्ट्रात करोना विषाणूचा शिरकाव झाला. तेव्हापासून रेल्वे परिसरात आणि रेल्वे डब्याच्या स्वच्छतेबाबत रेल्वेनी दक्षता घेतली आहे. कारण करोना विषाणू हा संसर्गरोग असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पान, मावा, गुटखा खाऊन रेल्वे गाडया आणि रेल्वे परिसरात पिचकार्‍या मारणार्‍या प्रवाशांविरोधात कारवाईचे अभियान सुरू केले आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार १ मार्च २०२० ते १० मार्च २०२०पर्यंतचा कालावधीत रेल्वे परिसर आणि रेल्वे गाडयात थुंकणार्‍या १३८ प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली आहे. त्यांचाकडून १३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

रेल्वेकडून स्वच्छतेवर भर

थुंकणार्‍या विरोधात रेल्वे प्रशासनाकडून नियमित कारवाई करत नव्हते. यामुळे आज रेल्वे ट्रक आणि रेल्वे परिसरात लाल रंगाचे डाग दिसून येते, असा आरोप प्रवासी संघटनाकडून करण्यात येत आहे. मात्र जेव्हापासून करोना व्हायरस मुंबईत शिरला तेव्हापासून रेल्वेकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. तसेच अशा थुंकणार्‍या आणि पान, मावा, गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणार्‍यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे देर आये दुरुस्त आये.

रेल्वे परिसरात आणि रेल्वे गाडयात थुंकणार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाला आम्ही नेहमीच करत होतो. मात्र रेल्वे थातूरमातूर कारवाई करायची आणि शांत बसायची. मात्र आता करोना व्हायरस गांर्भीय लक्षात घेता रेल्वेकडून कारवाई सुरू केली आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतोय, मात्रही कारवाई अशी सुरू राहावी अशी आशा आहे.सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

- Advertisement -

रेल्वे परिसरात आणि रेल्वे गाडयात थुंकणार्‍यांविरोधात रेल्वेकडून नियमीत कारवाई करण्यात येते. मात्र आता करोना विषाणूमुळे ही कारवाई व्यापक करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी मध्ये १४० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून २४ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


हेही वाचा – करोना व्हायरस : उद्यापासून तीन दिवस पुण्यातील दुकाने बंद


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -