Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई तनुश्रीने केली ओशीवरा पोलीस ठाण्यात तक्रार

तनुश्रीने केली ओशीवरा पोलीस ठाण्यात तक्रार

अखेर अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तनुश्रीने मुंबईतील ओशीवरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यामध्ये नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या नावाची समावेश आहे.

Related Story

- Advertisement -

अखेर अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. काल तनुश्रीने मुंबईतील ओशीवरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यामध्ये नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या नावाची समावेश आहे. २००८ साली हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या दरम्यान नाना पाटेकर यांनी आपली छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. त्या प्रकरणात तिने ही तक्रार तब्बल १० वर्षानंतर केली आहे. तर दुसरीकडे नाना पाटेकर यांनीही या प्रकरणात मौन सोडले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे. राजस्तानमध्ये शूटसाठी गेलेल्या नाना पाटेकर यांचे काल मुंबईत आगमन झाले असून त्यावेळी मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला.

complaint against nana patekar
तनुश्रीने पोलीसात तक्रार दाखल केली

यवतमाळमध्ये तनुश्रीचा फोटो जाळला

- Advertisement -

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवाडामधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा बायकांनी तनुश्रीच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी नाना पाटेकर यांना पाठिंबा दर्शवताना तनुश्रीचे फोटो जाळले. नाना यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. भावाप्रमाणे नेहमी आमच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांवर लावलेले आरोप खोटे असून आम्ही हे कधीही मान्य करणार नाही, असे या महिलांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -